वृत्तसंस्था
काबुल : तीन बॉम्बस्फोटांमुळे काबुल विमानतळ हादरल होतं. शंभरहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. आता त्यापेक्षाही अधिक मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने राष्ट्रपती ज्यो बायडेन यांना दिलं आहे. यामुळे अमेरिकेने काबुल विमानतळाची सुरक्षा अधिक कडक केली आहे. Will there be another major terrorist attack in Kabul? American intelligence information
अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या तीन बॉम्ब स्फोटांमुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या १३ सैनिकांचा समावेश आहे. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला असून या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासन) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. हा दहशतवादी गट तालिबानचा कट्टर विरोधक असल्याचं समजलंय जातं. सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणामध्ये आयसिसचा हा गट तालिबान्यांचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातोय.
दहशतवाद्यांना माफी नाही : जो बायडेन
या दहशतवाद्यांना आम्ही माफी करणार नसून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. अफगाणिस्तानमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने मिशन सुरु केलं असून अमेरिकन लष्कराने काबुल विमानतळाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस या ठिकाणी असलेल्या अमेरिकन लष्करासाठी अत्यंत तणावग्रस्त असणार आहेत.
अमेरिेकेने ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडून जावा,अशी अट तालिबानने घातली आहे. काबुल विमानतळ परिसराच्या काही भागावर आपले नियंत्रण असल्याचं तालिबानने जाहीर केलंय.
तालिबानने देश ताब्यात घेतल्यापासून हजारो नागरिक जीवाच्या भीतीने अफगाणिस्तान सोडत आहेत. या लोकांनी काबुल विमानतळावर गर्दी केली असून या विमानतळाचा ताबाअमेरिकन सैन्याने घेतला आहे.
Will there be another major terrorist attack in Kabul? American intelligence information
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई