• Download App
    WHOने जगातील दुसरी मलेरियाविरोधी लस वापरण्यास दिली मान्यता - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया WHO approves worlds second anti malarial vaccine  Serum Institute of India

    WHOने जगातील दुसरी मलेरियाविरोधी लस वापरण्यास दिली मान्यता – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

    SII ने ‘Novavax’ च्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून केली आहे विकसित .

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाच्या लसीला मान्यता दिली आहे, ज्यामुळे जगातील इतर अशा लसींचा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. WHO approves worlds second anti malarial vaccine  Serum Institute of India

    SII ने सांगितले की, लसीच्या ‘प्री-क्लिनिकल’ आणि ‘क्लिनिकल’ चाचणीशी संबंधित डेटाच्या आधारे ही मान्यता देण्यात आली आहे आणि चाचण्यांदरम्यान ही लस चार देशांमध्ये प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. SII ने एका निवेदनात म्हटले आहे की, मुलांना मलेरियापासून वाचवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) मान्यता मिळवणारी ही जगातील दुसरी लस बनली आहे.

    WHO ने R21/Matrix-M नावाची ही मलेरिया लस वापरण्यास मान्यता दिली आहे, जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि SII ने ‘Novavax’ च्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केली आहे.

    निवेदनात म्हटले आहे की पुणेस्थित SAII ला लस तयार करण्याचा परवाना देण्यात आला आहे आणि कंपनीने वार्षिक 10 कोटी डोस तयार करण्याची क्षमता आधीच गाठली आहे जी पुढील दोन वर्षांत दुप्पट केली जाईल.

    Bihar Caste Survey : बिहार सरकारने जारी केला जात जनगणना अहवाल, मागासवर्गीय 27.1 टक्के

    SII चे CEO आदर पूनावाला म्हणाले, ‘खूप काळापासून मलेरिया हा आजार जगभरातील अब्जावधी लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. त्यामुळेच मलेरियाशी लढण्यासाठी या लसीला मान्यता मिळणे हा एक मैलाचा दगड असल्याचे आहे.

    याशिवाय SII ने सांगितले की WHO ची मंजुरी मिळाल्यानंतर, अतिरिक्त नियामक मान्यता लवकरच अपेक्षित आहे आणि R21/Matrix-M लसीचा वापर पुढील वर्षीच्या सुरुवातीला सुरू होईल. सध्या घाना, नायजेरिया आणि बुर्किना फासोमध्ये ही लस वापरली जात आहे.

    WHO approves worlds second anti malarial vaccine  Serum Institute of India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या