वृत्तसंस्था
कोलंबो : प्रचंड महागाई आणि प्रचंड टंचाई यांनी होरपळून संतप्त झालेल्या श्रीलंकन जनतेने आज सरळ श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटा बाय राजपक्ष यांचे अधिकृत निवासस्थान “जनाधिपती मंदिरय्या” अर्थात श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावर थेट हल्लाबोल केला. संतप्त झालेल्या जनतेचे लोंढेच्या लोंढे राष्ट्रपती भवनात घुसले. जनतेचा हा उसळलेला संताप पाहून राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्ष यांनी अक्षरशः पोबारा केला आहे. Where is world only economist and advisor to SL prime minister Shri swamy sir
आर्थिक दृष्ट्या कोसळलेल्या श्रीलंकेत महागाई प्रचंड वाढली आहे. परकीय गंगाजळी संपुष्टात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईने जनता अक्षरशः होरपळली आहे. त्यामुळे जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. हीच संतप्त उद्रेक झालेली जनता कोलंबोतल्या राष्ट्रपती भवनात घुसली आहे. जनता एवढी संतप्त आहे की सरकारी यंत्रणेद्वारे कोणतीही आणीबाणी लागू करण्यासारखी देखील परिस्थिती उरलेली नाही. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे त्यांचे अधिकृत निवासस्थान सोडून पळून गेले. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
आंदोलकांचा राष्ट्रपती भवनाला घेराव
श्रीलंकेतील मानवाधिकार संघटना, राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी संचारबंदी हटवली. यापूर्वी विरोधकांचे आंदोलन रोखण्यासाठी कोलंबोसह पश्चिम प्रांतामधील सात भागांमध्ये संचारबंदी लागू होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी शनिवारी दुपारी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला आणि तोडफोड सुरु झाली. या तोडफोडीनंतर गोटाबाया राजपक्षे घर सोडून पळून गेले आहेत.
पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
राजधानी कोलंबोमध्ये आंदोलन अधिक चिघळले आहे. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. देशातील बिघडलेली परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. श्रीलंकन संसदेचे अधिवेशन देखील बोलवण्याची विनंती त्यांनी संसदेच्या अध्यक्षांना केली आहे.
Where is world only economist and advisor to SL prime minister Shri swamy sir