विशेष प्रतिनिधी
थायलंड : राजे गेले आणि सोबत राजांचे राज्य देखील गेले. भारतात लोकशाही आली. पण जगातील काही देशांमध्ये आजही राजांचे राज्य आहे. थायलंड हा त्यापैकीच एक देश आहे. थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न हे बऱ्याच गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत असतात. जेव्हा कोरोना काळात लोक महामारीचा सामना करण्यासाठी धडपडत होते. तेव्हा या महान राजाने आपला देश सोडून जाणे प्रेफर केले हाेते.
Where did the kings of Thailand go again? When there is political instability in the country, the Thai king fled again
थायलंडमध्ये बऱ्याच दिवसांपासून लोकशाहीच्या समर्थनार्थ निदर्शने होत आहेत. या पाश्र्वभूमीवर आता पुन्हा एकदा थायलंडचे राजा यांनी सोमवारी बव्हेरिया जर्मनी येथे आपला नवा तळ ठोकला आहे. एकूण 250 लोकांसह राजा तेथे गेले आहेत. तर एकूण 30 रॉयल पुडल्ससह हिल्टन म्युझिक विमानतळावरील हॉटेलचा संपूर्ण एक मजला या राजाने 11 दिवसांसाठी बुक केला आहे.
2020 मध्ये देखील लोकशाहीच्या समर्थनार्थ तसेच राजेशाही मध्ये सुधारणा करण्याचे आवाहन करत सरकारविरोधी निदर्शनांनी टोक गाठले होते. त्यावेळी देखील ह्या राजाने स्टार्नबर्ग मधील आपल्या वीलामध्ये दीर्घकाळासाठी मुक्काम ठोकला होता. थायलंडमध्ये राजकीय वातावरण तापलेले असताना देशाचा राजा असा वागतो तेव्हा देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र राजावर टीका केली होती. आणि ह्यावेळीही राजा दुसऱ्या देशात सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी गेला आहे.
Where did the kings of Thailand go again? When there is political instability in the country, the Thai king fled again
महत्त्वाच्या बातम्या
- मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते, आपल्याला आपली अधिकृत भाषा मजबूत करण्याची गरज आहे – अमित शहा
- MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार
- अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश
- Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…