• Download App
    पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्स मागे हटेना तेव्हा पाकिस्तानी लष्कर तालीबानींच्या बाजुने उतरले मैदानात, बंडखोर नेता मसूद अहमदचा दावा|When the Northern Alliance did not retreat in Panjshir, the Pakistani army sided with the Taliban, claimed rebel leader Masood Ahmed.

    पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्स मागे हटेना तेव्हा पाकिस्तानी लष्कर तालीबानींच्या बाजुने उतरले मैदानात, बंडखोर नेता मसूद अहमदचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    काबूल: अफगणिस्थानातील पंजशीर खोऱ्यात नॉर्दन अलायन्स मागे हटत नाही हे पाहून पाकिस्ताने आपले खरे रंग दाखविले. तालीबान्यांच्या बाजुने मैदानात उतरून पंजशीरमध्ये थेट हस्तक्षेप केला असा आरोप बंडखोर नेता मसूद अहमद यांनी केला आहे.When the Northern Alliance did not retreat in Panjshir, the Pakistani army sided with the Taliban, claimed rebel leader Masood Ahmed.

    मसूद अहमदने एक ऑडिओ मेसेज प्रसिद्ध केला आहे. पंजशीरमध्ये अजूनही विद्रोही सैन्य असून तालिबानविरोधात संघर्ष संपला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. फहीम दश्ती आणि मसूद याचे निकटवर्तीय हवाई हल्ल्यात ठार झाले. मसूद यांनी ऑडिओ मेसेजमध्ये तालिबानसोबत पाकिस्तानला यासाठी जबाबदार ठरवले आहे



    . पाकिस्तानने थेट पंजशीरमध्ये अफगाण नागरिकांवर हल्ला केला. ही बाब आंतरराष्ट्रीय समुदाय पाहत आहे. पाकिस्तानने पंजशीरमध्ये हवाई हल्ला केला होता. मात्र, त्यांची दोन विमाने पाडली असून काही पाकिस्तानी कमांडो ठार झाले. सध्या आमची लढाई तालिबानसोबत सुरू नसून पाकिस्तानी लष्करासोबत आणि आयएसआय सोबत सुरू आहे. तालिबानचे नेतृत्व पाकिस्तान करत असल्याचा दावा मसूद अहमद यांनी केला

    तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, मात्र पंजशीर प्रांतावर विजय मिळवता आला नव्हता. तालिबानने पंजशीरचा विजय प्रतिष्ठेचा केला. त्यानंतर १० हजारांची फौज अमेरिकन शस्त्रांसह पाठवली होती. रविवारी रात्री पाकिस्तानी आणि तालिबानी सैन्याने पंजशीर खोºयात जोरदार हल्ला केला.

    पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोनद्वारे हवाई हल्ला केल्याची माहिती अफगाणिस्तानच्या सामंगन प्रांतातील माजी खासदार जिया अरियनजादो यांनी दिली. ते म्हणाले की, पंजशीरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोनच्या मदतीने हवाई हल्ला केला आहे.

    अरियनजादो यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधील हस्तक्षेप उघड झाला आहे.पाकिस्तानकडून तालिबानला हवाई मदत दिली जात आहे. तालिबानच्या बाजूने लढण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने आपले स्पेशल फोर्स पॅराशूटच्या माध्यमातून पंजशीरमध्ये उतरवले आहेत.

    When the Northern Alliance did not retreat in Panjshir, the Pakistani army sided with the Taliban, claimed rebel leader Masood Ahmed.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या