विशेष प्रतिनिधी
पाकिस्तान : सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पाकिस्तानी पोलीस आपल्या मुलांना रस्त्यावर विकतोय आणि आपल्या प्रत्येक मुलाची किंमत 50 हजार रुपये आहे, असे तो या व्हिडिओमध्ये सांगताना दिसून येतो आहे. तर या व्हायरल व्हिडिओ मागची सत्यता आहे तरी काय?
What is the truth behind that Pakistani viral videos selling his children on the streets?
लशरीने आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकारयाकडून आपल्या मुलाच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी ऑफिसमधून सुट्टी मागितली होती. पण त्याच्या बॉसने ही सुट्टी मंजूर करण्यासाठी त्याच्याकडे लाच मागितली. त्याला लाच देणे जेव्हा जमले नाही, तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी त्याची बदली 120 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी केली. त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात त्याला जर कम्प्लेंट फाईल करायची असेल, तर त्याला कराचीला जावे लागेल.
Videos of Dolphins off Mumbai Coast went Viral amid Coronavirus scare…
तो म्हणतो की, मी इतका गरीब आहे की मी कम्प्लेंट फाईल करण्यासाठी कराचीला देखील जाऊ शकत नाही. माझ्या मुलाची मेडिकल ट्रीटमेंट करायची आहे. त्याच्यासाठी मी पैसे साठवावे? की अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी मी पैसे द्यावेत? याच्याविरूद्ध मला आवाज उठवायचा होता. म्हणून मी रस्त्यावर गरिबांच्या मूलभूत अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी हे सर्व केले, असे त्याने सांगितले आहे.
इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानमधील भ्रष्टाचाराविरूध्द बऱ्याच लोकांनी आवाज उठवला. त्यानंतर त्याला नोकरी परत मिळाली आणि 14 दिवसांची सुट्टी देखील देण्यात आलेली आहे. पण हे अतिशय दुखद आहे की गरीब माणसाला आजही स्वतःच्या मूलभूत हक्कांसाठी रोज मरमर मारावे लागते.
What is the truth behind that Pakistani viral videos selling his children on the streets?
महत्त्वाच्या बातम्या
- शिल्पा शेट्टीने मुंबईत सुरु केले रेस्टॉरंट ; सेलिब्रेटींनीसुद्धा जेवणासाठी हजेरी लावली
- कृषी कायदे रद्द; हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश, विरोधी पक्षांचे नव्हे; अण्णा हजारे यांचा टोला
- कृषी कायदे मागे घेताच कॅप्टन अमरिंदर यांचा उघडपणे मोदींना पाठिंबा, म्हणाले- भाजपसोबत जागा वाटून पंजाबमध्ये निवडणूक लढवणार
- Farm Laws : कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला काय करावे लागणार? वाचा सविस्तर पूर्ण प्रक्रिया…