• Download App
    Good News : "गुजरातमध्ये Google ग्लोबल फिनटेक सेंटर उघडणार" पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर सुंदर पिचाईंची घोषणा! We are announcing the opening of our global fintech operation centre in GIFT City Gujarat Google CEO Sundar Pichai

    Good News : “गुजरातमध्ये Google ग्लोबल फिनटेक सेंटर उघडणार” पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर सुंदर पिचाईंची घोषणा!

    भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये तब्बल 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत असल्याचेही सांगितले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन: गुगल गुजरातमध्ये त्यांचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर उघडणार आहे, अशी घोषणा कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर केली. मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या प्रमुख मोहिमेसाठी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचेही त्यांनी कौतुक केले. We are announcing the opening of our global fintech operation centre in GIFT City Gujarat Google CEO Sundar Pichai

    वृत्तसंस्था एएनआयने सुंदर पिचाईच्या हवाल्याने म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदींना त्यांच्या ऐतिहासिक यूएस दौऱ्यात भेटणे हा सन्मानाचा विषय होता. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत शेअर केले की Google भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. आम्ही गुजरातमध्ये आमचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर उघडण्याची घोषणा करत आहोत.”

    गुगलचे सीईओ म्हणाले, “डिजिटल इंडियासाठी पंतप्रधानांचे व्हिजन वेळेच्या आधीचे होते आणि मी आता याला एक ब्लू प्रिंट म्हणून पाहतोय. जे इतर देश करू पाहत आहेत.”

    पिचाई व्यतिरिक्त, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक हे देखील शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार्‍या व्यावसायिकांमध्ये होते.

    We are announcing the opening of our global fintech operation centre in GIFT City Gujarat Google CEO Sundar Pichai

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या