सुरुंग शोधण्यात एक्सपर्ट असलेला एक उंदीर निवृत्त झाल्याचे सांगितले तर आश्चर्य वाटले ना ! पण, हे खरे आहे. टांझानिया येथील हा उंदीर ‘मागवा’ या नावाने ओळखला जातो. त्याने तब्बल 71 सुरुंग तसेच कित्येक स्फोटक शोधून हजारो जणांचे प्राण वाचविले आहेत. वयोमानानुसार त्याची सुरुंग शोधण्याची शक्ती कमी झाल्याने तो आता सेवानिवृत्त झाला आहे. जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी टांझानिया येथील अपोपो ही संस्था 1990 सालापासून उंदरांना प्रशिक्षण देते. मागवाला तिथेच प्रशिक्षण दिले होते. येथे प्रशिक्षण घेतलेल्या उंदरांना ‘हिरो रॅट’ म्हणून संबोधले जाते.
मागवाचे वजन 1.2 किलो असून तो फक्त 70 सेमीचा आहे. इतर उंदरांच्या जातीपेक्षा हा उंदीर हलका असतो. मागील वर्षी मागवाला पीडीएसए या संस्थेने सुवर्णपदक देऊन सन्मानित केले होते. या उंदराची खासियत म्हणजे टेनिस कोर्ट इतक्या मैदानातून तो अवघ्या 20 मिनिटांत सुरुंग शोधू शकतो. watch Hero Rat from Tanzania Retired, Saved Thousands lives by Searching Land Mines
महत्त्वाच्या बातम्या
- लोकप्रियता ओसरताच संघ मोदींना अडवानींसारखा बाजूला सारेल; काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा दावा
- Maharashtra Unlocked : राज्य सरकारच्या निकषानुसार नागपूरचा समावेश पहिल्या स्तरात ; जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर ; वाचा सविस्तर
- पुणेकरांना लोकल सुरु होण्याची प्रतीक्षा; एसटी, पीएमपीला परवानगी मग लोकल का नाही ?
- हैद्राबाद, नागपूरकडेही बुलेट ट्रेन धावणार ; मुंबई – अहमदाबाद मार्गासाठी गुजरातमध्ये वेग
- १,००,१३० : एक लाख कोरोना बळींचा महाराष्ट्रावर कलंक… देशातील प्रत्येक तीन मृत्यूंमागे महाराष्ट्रात जवळपास एक बळी