• Download App
    पाकिस्तानात तहरीक-ए-लब्बैककडून पुन्हा हिंसाचार, सहा पोलिसांचं केलं अपहरण, अनेकांचा मृत्यू । Violence erupts again from Tehreek-e-Labbaik Pakistan during Protest over arrest of Saad Rizvi

    पाकिस्तानात तहरीक-ए-लब्बैककडून पुन्हा हिंसाचार, सहा पोलिसांचं केलं अपहरण, अनेकांचा मृत्यू

    Tehreek-e-Labbaik Pakistan : पाकिस्तानने नुकतीच बंदी घातलेली संघटना तहरिक ए लब्बैक पाकिस्तान अर्थात TLPचा प्रमुख साद हुसैन रिझवी याला अटक केली होती. रिझवीच्या अटकेनंतर देशभरात ठिकठिकाणी हिंसा उफाळली आहे. एक दिवसआधीच ही हिंसा रोखण्यासाठी पाकिस्तानने चार ते पाच तास सोशल मीडिया साइट्स बंद केल्या होत्या. परंतु आज पुन्हा पाकिस्तानात मोठा हिंसाचार घडवण्यात आला आहे. लाहोरमध्ये टीएलपी समर्थकांनी पोलिसांशी केलेल्या संघर्षात तीन टीएलपी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. मागच्या महिन्यापासून अशाच प्रकारची हिंसा सुरू आहे. आतापर्यंत यात अनेक जण दगावले आहेत. टीएलपीच्या सदस्यांनी आज सहा पोलिस अधिकाऱ्यांचं अपहरण केल्याचं वृत्त आहे. Violence erupts again from Tehreek-e-Labbaik Pakistan during Protest over arrest of Saad Rizvi


    वृत्तसंस्था

    कराची : पाकिस्तानने नुकतीच बंदी घातलेली संघटना तहरिक ए लब्बैक पाकिस्तान अर्थात TLPचा प्रमुख साद हुसैन रिझवी याला अटक केली होती. रिझवीच्या अटकेनंतर देशभरात ठिकठिकाणी हिंसा उफाळली आहे. एक दिवसआधीच ही हिंसा रोखण्यासाठी पाकिस्तानने चार ते पाच तास सोशल मीडिया साइट्स बंद केल्या होत्या. परंतु आज पुन्हा पाकिस्तानात मोठा हिंसाचार घडवण्यात आला आहे. लाहोरमध्ये टीएलपी समर्थकांनी पोलिसांशी केलेल्या संघर्षात तीन टीएलपी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. मागच्या महिन्यापासून अशाच प्रकारची हिंसा सुरू आहे. आतापर्यंत यात अनेक जण दगावले आहेत. टीएलपीच्या सदस्यांनी आज सहा पोलिस अधिकाऱ्यांचं अपहरण केल्याचं वृत्त आहे.

    काय आहे प्रकरण?

    पैगंबर मोहम्मद यांचं व्यंगचित्र प्रकाशित झाल्यामुळे पाकमधील फ्रान्सच्या राजदूताला बरखास्त करण्याची मागणी टीएलपी या संघटनेने केली होती. यासाठी पाक सरकारवर दबाव आणण्यात येत होता. टीएलपीने सरकारला 20 मार्चची डेडलाइनही दिली होती. सरकारने परिस्थिती चिघळू नये म्हणून टीएलपी प्रमुख साद रिझवीलाच अटक केली. परंतु यानंतर टीएलपी समर्थकांनी देशभरात हिंसाचार घडवायला सुरुवात केली. अशाच हिंसक घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. पाक सरकारने हिंसक कारवायांमुळे टीएलपी संघटनेवर नुकतीच बंदीही घातली आहे.

    पेशावरमध्ये चार सुरक्षा कर्मचारी ठार

    उत्तर-पश्चिमी पाकिस्तानमध्ये शनिवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एक चेक पोस्टवर गोळीबार केला. यात चार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पाक सैन्याने सांगितले की, हल्ला पाकिस्तान-अफगानिस्तान सीमेच्या जवळ दक्षिण वजीरिस्तानमध्ये झाला. सुरक्षा दलांनी यानंतर केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाई चार हल्लेखोर ठार झाले. खैबर पख्तूनख्वांचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी हल्ल्याची निंदा करत शहीद झालेल्या जवानांप्रति शोक व्यक्त केला आहे.

    Violence erupts again from Tehreek-e-Labbaik Pakistan during Protest over arrest of Saad Rizvi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!