बॅँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्या याला इंग्लंडच्या न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्याची दिवाळखोरीची याचिका लंडन उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑ फ इंडियाचचे त्याने बुडविलेले पैसे वसूल होण्याची आशा निर्माण झाली आहे. Vijay Mallya was struck down by a London court and his bankruptcy petition was rejected
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॅँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्या याला इंग्लंडच्या न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्याची दिवाळखोरीची याचिका लंडन उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचचे त्याने बुडविलेले पैसे वसूल होण्याची आशा निर्माण झाली आहे.
लंडन उच्च न्यायालयाने मल्याच्या संपत्तीवर असलेले सुरक्षा कवच हटविले आहे. त्यामुळे आता बॅँका मल्याची भारतातील संपत्ती जप्त करून कर्ज वसूल करू शकतील. भारतीय बॅँकांची तब्बल ९०० कोटी रुपयांची फसवणूक करून विजय मल्या इंग्लंडमध्ये पळून गेला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात मागणी केली होती की, विजय मल्ल्या याच्या भारतातील संपत्तीवर असलेलं सुरक्षा कव्हर हटवण्यात यावे. उच्च न्यायालयाने बँकांची ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे बँका मल्याची संपत्ती जप्त करुन त्याचा लिलाव करु शकतील आणि आपली रक्कम वसूल करु शकतील. विजय मल्याची किंगफिशर ही मद्यउत्पादक कंपनी आहे.
लंडन उच्च न्यायालयाचे चीफ इन्सॉल्वेंसी अँड कंपनीज कोटार्चे न्यायमूर्ती मायकल ब्रिग्स यांनी भारतीय बँकांच्या बाजूने निर्णय दिलाय. विजय मल्ल्या याच्या संपत्तीला सुरक्षा कव्हर प्रदान करण्यासाठी कोणतीही पब्लिक पॉलिसी उपल्बध नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एकेकाळी आपल्या आलिशान राहणीसाठी प्रसिध्द असलेला विजय मल्या पूर्ण कंगाल झाला आहे. न्यायालयाचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने त्याच्याकडे पैसे नाहीत. वैयक्तिक खर्चांना चाप बसला आहेच विजय मल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नाही. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या मल्याने लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फ्रान्समधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी 14 कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत, अशी विनंती त्याने या याचिकेतून कोटार्ला केली आहे. लंडनमध्ये मल्याच्या बाजूने खटला लढवणाऱ्या वकिलाला त्याची फी मिळाली नाही. त्यामुळे या वकिलाने पुढच्या सुनावणीपर्यंत रकम न मिळाल्यास खटला लढणे बंद करणार असल्याचा इशारा दिला आहे.
Vijay Mallya was struck down by a London court and his bankruptcy petition was rejected
महत्वाच्या बातम्या
- आक्रमक सोलापुर पुढे राष्ट्रवादी नमली, उजनीतले पाणी पळवण्याचा आदेश रद्द
- दिवसभरात शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी कमावले तब्बल तीन लाख कोटी, सेन्सेक्स पुन्हा ५० हजारांच्यावर
- ‘लिव्ह-इन’ संबंध अस्वीकारार्ह असल्याचे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे निरीक्षण
- चक्रीवादळाने गुजरातमध्ये रात्रभर हाहाकार, किनारपट्टीवर प्रचंड नुकसान
- पतीला इंजेक्शन न मिळाल्याने सैरभेर झालेल्या पत्नीची जीव देण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ पाठवल्याने खळबळ
- आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी पी. चिदंबरम यांना धक्का