Vaccination : देश आणि जगातील कोरोना साथीचा रोग संपुष्टात आणण्यासाठी लसीकरण मोहीम जलदगतीने राबविण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोनाची लस प्रौढांना दिली जात होती, परंतु आता अमेरिकेसह जगातील इतर अनेक देशांमध्ये बालकांना फायझर लस दिली जात आहे. दरम्यान, जर्मनीतूनही एक चांगली बातमीही आली आहे. येथील मुलांना पुढच्या महिन्यापासून कोरोना लस मिळणार आहे. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी माहिती दिली की, 7 जूनपासून कोरोनाची लस 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांनादेखील दिली जाईल. येथे युरोपियन मेडिसिन एजन्सीने आधीच 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची परवानगी दिली आहे. Vaccination Germany Childrens Above 12 Years To Be Vaccinated From June 7th
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देश आणि जगातील कोरोना साथीचा रोग संपुष्टात आणण्यासाठी लसीकरण मोहीम जलदगतीने राबविण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोनाची लस प्रौढांना दिली जात होती, परंतु आता अमेरिकेसह जगातील इतर अनेक देशांमध्ये बालकांना फायझर लस दिली जात आहे. दरम्यान, जर्मनीतूनही एक चांगली बातमीही आली आहे. येथील मुलांना पुढच्या महिन्यापासून कोरोना लस मिळणार आहे. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी माहिती दिली की, 7 जूनपासून कोरोनाची लस 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांनादेखील दिली जाईल. येथे युरोपियन मेडिसिन एजन्सीने आधीच 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची परवानगी दिली आहे.
पत्रकारांशी झालेल्या संभाषणादरम्यान अँजेला मर्केल म्हणाल्या की, 12 वर्षांपुढील मुले 7 जूनपासून लसीसाठी अपॉइंटमेंट घेऊ शकतात. त्या पुढे म्हणाल्या की, ज्यांना आपल्या मुलांना कोरोनाची लस घ्यायची इच्छा आहे, त्यांना लसीचे दोन्ही डोस ऑगस्टपूर्वी म्हणजे शाळेच्या नवीन हंगामापर्यंत मिळतील. मर्केल म्हणाल्या, “पालकांसाठी हा संदेश आहे की कोणत्याही मुलासाठी ही लस बंधनकारक होणार नाही.” त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना शाळांमध्ये लस देण्याची गरज नाही. तसेच आपण फक्त लसीकरण केलेल्या मुलासह सुटीवर जाऊ शकता, असा विचार करणेही पूर्णपणे चुकीचे ठरेल.’
हर्ड इम्युनिटी बनण्याच्या दिशेने पाऊल
मुलांच्या लसीकरणास साथीच्या रोगाच्या विरुद्ध लढाईत हर्ड इम्युनिटी बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जातआहे. मेमध्ये कॅनेडियन आरोग्य नियामकाने 12 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर कंपनीची कोरोना लस मंजूर केली आहे. याशिवाय अमेरिकेसह अनेक देशांतील मुलांना ही लस दिली जात आहे. फायझरने मार्चच्या उत्तरार्धात अमेरिकेतील १२ ते 15 वयोगटातील 2260 स्वयंसेवकांवर केलेल्या अभ्यासाचे प्राथमिक निकाल जाहीर केले. यावरून असे आढळले की लसीकरण झालेल्या मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला नाही.
Vaccination Germany Childrens Above 12 Years To Be Vaccinated From June 7th
महत्त्वाच्या बातम्या
- Delhi Unlock : दिल्लीत अनलॉकला सुरुवात, सर्वात आधी बांधकामे, कारखाने सुरू होणार, मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा
- DRDO चे 2-DG अँटी कोरोना औषध बाजारात, एका सॅचेटची किंमत 990 रुपये
- राहुल गांधींना भाजपचे प्रत्युत्तर, जावडेकर म्हणाले- त्यांची नौटंकी जनतेने केव्हाच बंद केली!
- Narada Sting Case : कोलकाता हायकोर्टाकडून चारही तृणमूल नेत्यांना अंतरिम जामीन मंजूर, पण या अटी ठेवल्या
- गुगल – जिओचा सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन, लवकरच आणणार भारतीय बाजारात