विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली असून आता १२ वर्षांपुढील सर्वांना फायझर कंपनीने विकसीत केलेली लस दिली जाणार आहे.USA start giving vaccine to children also
शाळा सुरु होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना लस देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या नव्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.
जनजीवन सुरळीत करण्यासाठी अमेरिका सरकार वेगाने उपाय योजना राबवित आहे.
लस सल्लागार समितीने १२ ते १५ वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींना लस देण्यास हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर तातडीने लसीकरण मोहिम आखण्यात आली.
विविध कंपन्यांच्या लशी केवळ १८ वर्षांवरील व्यक्तींनाच दिल्या जात आहेत. फायझरची लस मात्र १६ वर्षांच्या मुलांनाही दिली जात आहे. आता हा वयोगट आणखी कमी करण्यात आला आहे.
दरम्यान इटलीमधील एका २३ वर्षांच्या युवतीला फायझर लशीचे सहा डोस दिले गेल्याची घटना उघडकीस आले आहे. एका रुग्णालयात लसीकरणासाठी ही युवती गेली असता
तेथील लस देणाऱ्या नर्सने एका लशीच्या बाटलीतील सर्व औषध सीरिंजमध्ये भरले आणि सर्वच्या सर्व त्या युवतीच्या शरीरात टोचले. लस देऊन झाल्यावर तिच्या चूक लक्षात आली.
वास्तविक एका बाटलीतून सहा जणांना डोस देता येतात. यानंतर लगेचच त्या युवतीला रुग्णालयात दाखल करून तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. २४ तासांत काहीही त्रास न झाल्याने तिला घरी सोडून देण्यात आले.
USA start giving vaccine to children also