• Download App
    अमेरिकेचा तब्बल सहा हजार अब्ज डॉलरचा अर्थसंकल्प, धनाढ्यांवर करवाढीचे संकट|USA president tabled budget

    अमेरिकेचा तब्बल सहा हजार अब्ज डॉलरचा अर्थसंकल्प, धनाढ्यांवर करवाढीचे संकट

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुढील वर्षासाठी सहा हजार अब्ज डॉलर अर्थसंकल्पाचा प्रस्ताव शनिवारी मांडला. यात गरीब व मध्यमवर्गीयांच्या हिताच्या तरतुदींसह धनाढ्यांवरील करात वाढ करण्याचा विचार व्यक्त करण्यात आला आहे.USA president tabled budget

    बायडेन यांच्या सहा हजार अब्ज डॉलरच्या अर्थसंकल्पात कोरोनासाठी एक हजार ९०० अब्ज डॉलरची मदत आणि पायाभूत सुविधांसाठी जाहीर केलेल्या दोन हजार ३०० अब्ज डॉलरचा समावेश आहे.



    पायाभूत सुविधांच्या मदतीवर रिपब्लिकन पक्षाची मंजुरी मिळविण्याचे बायडेन यांचे प्रयत्न आतापर्यंत फोल ठरलेले असताना करवाढीच्या मुद्यावर रिपब्लिकन पक्ष ‘फिलिबस्टर’ नियम लागू करण्याची शक्यता आहे. त्यानंतर १०० सदस्यीय सिनेटमध्ये ६० सदस्यांचे समर्थन मंजुरीसाठी आवश्याक असेल.

    सध्याच्या काळात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर पडलेला ताण हलका करण्यासाठी ही करवाढ प्रस्तावित असली तरी त्या प्रतिनिधिगृहांची मंजुरी मिळण्याबाबत तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.

    USA president tabled budget

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या