Times Square Firing : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील गन कल्चरमुळे तेथे सातत्याने गोळीबारीच्या घटना होत असतात. आता टाइम्स स्क्वेअरमधील घटनेत एका चार वर्षांच्या चिमुरडीसह तीन जणांवर गोळीबार करण्यात आला आहे. USA New York Times Square Firing, 3 injured including 4 year old girl
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील गन कल्चरमुळे तेथे सातत्याने गोळीबारीच्या घटना होत असतात. आता टाइम्स स्क्वेअरमधील घटनेत एका चार वर्षांच्या चिमुरडीसह तीन जणांवर गोळीबार करण्यात आला आहे.
एका वादामुळे गोळीबार सुरू झाला. पण या वादाशी ज्यांचा काहीही संबंध नव्हता अशा तीन जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार करायला सुरुवात केली. ही घटना शनिवारी संध्याकाळी 5 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान तेथे उपस्थित 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये 4 वर्षांची चिमुरडीही सामील आहे, ती आपल्या कुटुंबासह खेळणी खरेदीसाठी गेली होती.
पोलीस आयुक्त डेरमॉट शिया म्हणाले की, ब्रूकलिनमध्ये राहणाऱ्या कुटुंब आपल्या लहान मुलीला खेळणी विकत घेण्यासाठी आले होते. गोळीबारात चिमुरडीच्या पायावर गोळी लागली आहे. याशिवाय ऱ्होड आयलँडच्या 23 वर्षीय महिला पर्यटक आणि न्यूजर्सीच्या 43 वर्षीय महिलेलाही गोळी लागली आहे. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपींचा शोध सुरू
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटवली आहे. त्याच्याबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. तथापि, वादाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या सर्व प्रकरणात दोन ते चार जणांचा समावेश असू शकतो. वादादरम्यान, यापैकी एकाने बंदूक काढली आणि गोळीबार सुरू केला.
NYPDच्या अधिकाऱ्यांच्या मते, शूटरचा माग काढण्यासाठी एक सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डे ब्लासियो यांनी सोशल मीडियावर लिहिले की, या संवेदनहीन हिंसेतील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे, NYPD त्यांना न्याय जरूर देईल.
USA New York Times Square Firing, 3 injured including 4 year old girl
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नेहरू, गांधी घराण्याच्या पुण्याईवर आजपर्यंत देश तगला’; शिवसेनेकडून काँग्रेसवर स्तुतिसुमने, तर पीएम मोदींवर टीका
- Kabul Blast : काबूलमध्ये शाळेबाहेर कारचा भीषण स्फोट, 55 ठार, 150 हून अधिक जखमी; मृतांमध्ये शाळकरी मुलींची संख्या जास्त
- Corona Cases in India Today : देशात चिंताजनक स्थिती, सलग ४थ्या दिवशी ४ लाखांहून जास्त रुग्ण, ४०९२ मृत्यू
- Shivsena Vs Congress : शिवसेना मंत्री अनिल परबांकडून काँग्रेस आमदाराच्या कामात अडथळे, जिशान सिद्दिकींनी ट्वीटरवर व्यक्त केली वेदना
- आदर्श गाव : पद्मश्री पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारचा इथेही आदर्श ; कोरोनामुक्तीचा वसा आणि संकल्पपूर्ती