• Download App
    अमेरिकेकडून भारताला कोरोना प्रतिबंधक लशीचे ७५ लाख डोस, आणखी डोसची मागणी USA gave 75 lack doses to India

    अमेरिकेकडून भारताला कोरोना प्रतिबंधक लशीचे ७५ लाख डोस, आणखी डोसची मागणी

     

    वॉशिंग्टन – अमेरिकेने भारताला आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशीचे केवळ ७५ लाख डोस दिले आहेत. भारताला आणखी डोस देण्याची मागणी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील भारतीय वंशाचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी केली. USA gave 75 lack doses to India

    भारत व अन्य देशांसाठी लसीकरण मदत मोहिमेचा विस्तार करण्याचा प्रयत्न कृष्णमूर्ती करीत असून त्यासाठी अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांमधील ११६ सदस्यांचा पाठिंबा त्यांनी मिळविला आहे.



    कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका जगासमोर असताना लसीकरण मदत कार्यक्रमाचा विस्तार करण्यासाठी जास्त डोस दिले पाहिजे, अशी विनंती त्यांनी बायडेन प्रशासनाला केली.

    कृष्णमूर्ती म्हणाले की, जोपर्यंत कोणत्याही देशात कोरोनाचे अस्तित्व असेल, तोपर्यंत संपूर्ण जगाला विषाणूच्या नव्या धोक्याला सामोरे जावे लागणार आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. या पार्श्वेभूमीवर आपण कोरोनामुक्तीची घोषणा करणे आवश्याक आहे.

    म्हणूनच लशीच्या अब्जावधी डोसचे उत्पाोदन आणि वितरणासाठी आवश्याक आंतरराष्ट्रीय भागीदारी करून या साथीचा नायनाट करण्याची गरज आहे. जगातील प्रमुख लोकशाही देशांनी आणि या जीवरक्षक लशींच्या उत्पादकांनी सातत्याने सहकार्य करायला हवे.

    USA gave 75 lack doses to India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका

    Trump : ब्रिटनच्या शाही राजवाड्यात ट्रम्प यांचे भव्य स्वागत; किंग चार्ल्ससोबत सोन्याच्या बग्गीतून प्रवास

    Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही