विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अफगाणिस्तानमधून अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर सत्ताधीश बनलेल्या तालिबान्यांची आता मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. दा अफगाणिस्तान बँकेतील ९.५ अब्ज डॉलरचा निधी गोठविण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाने घेतला आहे.USA freeze Afgan govt. accounts
हा पैसा तालिबान्यांच्या हाती पडू नये म्हणूनच अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील काही बँकांमध्ये अफगाणिस्तान सरकारच्या ठेवी असून त्या पूर्णपणे गोठविण्यात आल्यात आहेत.
बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे अफगाणच्या मध्यवर्ती बॅंकेने अमेरिकेत ठेवलेल्या ठेवी तालिबान्यांना काढता येणार नाही, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या माहितीनुसार एप्रिलपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर अफगाण सेंट्रल बँकेने न्यूयॉर्कमधील फेडरल रिझर्व्हमध्ये तब्बल ९.५ अब्ज डॉलरचा निधी ठेवला आहे. अन्य वित्तीय संस्थांमध्ये देखील मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यात आली आहे
अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेचे हंगामी गव्हर्नर अजमल अहमदी यांनी म्हटले आहे, की तालिबानला हा पैसा मिळू नये म्हणूनच अमेरिकेने हा निधी गोठविला आहे. अमेरिकेत ९/११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर तालिबानवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते.
USA freeze Afgan govt. accounts
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी लोकांनी टिकटॉकर महिलेला केली मारहाण, शंभरावर जणांवर गुन्हा दाखल
- तालीबानने बंद केली भारतासोबतची आयात-निर्यात, सुकामेव्याच्या किंमतीत वाढ होण्याची भीती
- अमेरिकेने अफगणिस्थानची ९.५ अब्ज डॉलर्सची मालमत्ता गोठवली
- अफगणिस्थानमधील पराभवाचे खापर ज्यो बायडेन यांच्यावर, अमेरिकेतील लोकप्रियता सात टक्यांनी घटली