• Download App
    इराणमधील संकेतस्थळांवर अमेरिकेचा ताबा, दोन्ही देशातील शांतता चर्चा ठप्प USA attack on Irans websites

    इराणमधील संकेतस्थळांवर अमेरिकेचा ताबा, दोन्ही देशातील शांतता चर्चा ठप्प

    विशेष प्रतिनिधी

    तेहरान – अमेरिकेने इराण सरकारशी संबंधित असलेल्या अनेक वृत्तसंकेतस्थळांचा ताबा स्वत:कडे घेतला. या घटनेला अमेरिकेसह इराणच्या अधिकाऱ्यांनीही पुष्टी दिली आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांवर दबाव निर्माण करण्यासाठी अमेरिकेने ही कृती केल्याचे सांगितले जाते. अमेरिकेने जवळपास तीन डझन संकेतस्थळांचा ताबा मिळविला आहे. यातील बहुतेक संकेतस्थळांवरून चुकीची माहिती पसरविली जात होती, असे अमेरिकेचे मत आहे. USA attack on Irans websites

    गाझा पट्टीतील पॅलेस्टाइन टुडे या इराणच्या अणुकार्यक्रमाला आळा घालण्यासाठी जागतिक शक्तींबरोबर २०१५ मध्ये झालेल्या शांतता कराराची पुन्हा अंमलबजावणी करण्यासाठी व्हिएन्ना येथे चर्चा सुरु आहे. मात्र, इराणमध्ये कट्टरतावादी इब्राहिम रईसी यांचे सरकार आल्यापासून या शांतता कराराचे भवितव्य पुन्हा अंधारात गेले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यास अथवा त्यांना भेटण्यास रईसी यांनी नकार दिला असून इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबतही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    इराणच्या सरकारी मालकीच्या प्रेस टीव्हीसह अल मसिरा, अल आलम आणि इतर अनेक संकेतस्थळांना भेट दिल्यास तेथे अमेरिका सरकारची नोटीस प्रसिद्ध करण्यात आल्याचे दिसते. कायदेशीर कारवाई करताना अमेरिकेच्या उद्योग आणि सुरक्षा विभागाने, निर्यात संचालनालयाने आणि एफबीआयने या सर्व संकेतस्थळांचा ताबा घेतला आहे, असे नोटिशीत म्हटले आहे.

    USA attack on Irans websites

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीनने जम्मू-काश्मीरमधील शक्सगाम खोरे आपले असल्याचे सांगितले, म्हटले- पाकिस्तानपर्यंतचा रस्ता हद्दीत बांधत आहोत, भारताने बेकायदेशीर ताबा म्हटले

    Iran Violence : इराण हिंसाचार- तेहरानमधील रुग्णालयासमोर प्रेतांचा ढिगारा, 15 दिवसांत 544 लोकांचा मृत्यू

    Marco Rubio : ट्रम्पनंतर कोण होणार अमेरिकेचा कारभारी, उपराष्ट्रपती व्हेन्सऐवजी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांचा दर्जा वाढला