विशेष प्रतिनिधी
काबूल – तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शिरकाव केल्यानंतर अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिलखती वाहनातून विमानतळाच्या दिशेने नेण्यात आले.USA and Indians rescued from Afghanistan safely
भारतानेसुद्धा अफगाणिस्तातील भारतीयांना मायदेशात आणण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियाचे एआय-२४४ विमान काबूलहून १२९ भारतीयांना घेऊन सायंकाळी नवी दिल्लीत दाखल झाले.
शनिवारी काबूल शहराबाहेर तालिबानी फौजा दाखल झाल्याचे समोर आल्यानंतर अनेक देशांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
त्यामुळे अमेरिकेने आपल्या दूतावासातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुखरूप मायदेशी नेण्याचे प्रयत्न सुरू केले असताना दुसरीकडे हजारो सामान्य नागरिकांनी काबूलमधील उद्याने आणि मैदानांमध्ये आसरा घेतला.काबूलमध्ये तालिबान्यांनी शिरकाव केल्यानंतर अनेक देशांनी अफगाणिस्तानातील त्यांच्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
USA and Indians rescued from Afghanistan safely
महत्त्वाच्या बातम्या
- जगभरातील तबब्ल दीड कोटी भारतीयांनी राष्ट्रगीत गात रचला अनोखा विक्रम
- मुबंईत लोकल प्रवासाला मिळणार उत्तम प्रतिसाद, लस घेतलेल्या तब्बल ५५ हजार काढला लोकलचा पास
- स्वातंत्र्यरथावर वीर सावरकरांचा फोटो असल्याने कार्यक्रम उधळला, कट्टर मुस्लिम पक्ष सोशल डेमॉक्रॅटीक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कर्नाटकात गोंधळ
- राज्यसभेच्या तालिकेवर जाण्यास विरोधी पक्षाच्या तीन खासदारांचा नकार, वंदना चव्हाणांसह तिघांनी सभापतीपद स्वीकारण्यास दिला नकार