• Download App
    भुकबळीच्या दिशेने जात असलेल्या अफगणिस्थानला अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघाकडून मानवतेच्या भावनेतून मदत, अमेरिका देणार ४७१ कोटी|US to provide Rs 471 crore in humanitarian aid to Afghanistan

    भुकबळीच्या दिशेने जात असलेल्या अफगणिस्थानला अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघाकडून मानवतेच्या भावनेतून मदत, अमेरिका देणार ४७१ कोटी

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : अफगणिस्थानमध्ये तालीबानी फौजेचा कब्जा हा अमेरिकेचा पराभव मानला जात असला तरी अमेरिकेने मानवतेच्या भावनेतून मदत करण्याचे ठरविले आहे. भुकबळींच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अफगणिस्थानला अमेरिका ४७१ कोटी रुपयांची मदत देणार आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र्रसंघाकडूनही १४७.२६ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.US to provide Rs 471 crore in humanitarian aid to Afghanistan

    संयुक्त राष्ट्र्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, युद्धग्रस्त अफगानिस्तानमधील मानवी मुल्यांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र्रसंघ प्रतिबध्द आहे. अफगानिस्तानातील लोकांना गेल्या अनेक दशकांपासून युध्द, वेदना आणि असुरक्षेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता आंतराष्ट्रीय समाजाला अफगणिस्थानातील जनतेच्या मागे उभे राहावे लागेल.



    अफगणिस्थानच्या टोलो न्यूज चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉम्पसन- ग्रीनफील्ड यांनी आर्थिक मदतीचे वर्णन मानवतावादी मदत म्हणून केले आहे. त्या म्हणाल्या की अफगणिस्थानची परिस्थिती गंभीर आहे.

    अशा परिस्थितीत अमेरिकेने मानवतावादी भूमिकेतून ६४ मिलीयन डॉलर्स मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. परिस्थिती पाहून भविष्यात आणखी मदत केली जाईल.चीननेही अफगणिस्थानला ३१ मिलीयन डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यामध्ये अन्न पुरवठा आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा समावेश आहे.

    US to provide Rs 471 crore in humanitarian aid to Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या