origin of Corona : कोरोना महामारीवरून अमेरिकेने पुन्हा एकदा चीनविरुद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेक अहवालांत असे म्हटले आहे की, चीनच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणू तयार झाला आहे आणि अमेरिकेतील सर्वोच्च शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला स्पष्टपणे सांगितले आहे की, चीनविरुद्ध पारदर्शक पद्धतीने निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. व्हाइट हाऊसच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की कोरोना विषाणूचे मूळ शोधणे अत्यंत आवश्यक आहे. US slams China on the origin of Corona, White House scientists say, it is necessary to reveal the truth of China
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कोरोना महामारीवरून अमेरिकेने पुन्हा एकदा चीनविरुद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेक अहवालांत असे म्हटले आहे की, चीनच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणू तयार झाला आहे आणि अमेरिकेतील सर्वोच्च शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला स्पष्टपणे सांगितले आहे की, चीनविरुद्ध पारदर्शक पद्धतीने निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. व्हाइट हाऊसच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की कोरोना विषाणूचे मूळ शोधणे अत्यंत आवश्यक आहे.
चीनविरुद्ध पारदर्शक तपास
गेल्या एक महिन्यादरम्यान जगातील अनेक दिग्गज शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचे स्वरूप ज्या प्रकारे बदलत आहे, त्यावरून अशी शक्यता व्यक्त केली आहे की, तो नैसर्गिक विषाणू असल्याचे दिसून येत नाही. कारण नैसर्गिक विषाणू वेगवेगळ्या हवामानात सारखा राहू शकत नाही आणि जगातील सर्व देशांमध्ये सारखा विनाश घडवू शकत नाही. जगातील अनेक सर्वोच्च शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाला आहे. त्याचबरोबर व्हाइट हाऊसचे ज्येष्ठ सल्लागार अॅन्डी स्लाव्हिट यांनी म्हटले आहे की, ‘आम्हाला चीनकडून पारदर्शकतेची अपेक्षा आहे. आम्हाला यामध्ये सहकार्य करावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला कोरोना विषाणूच्या उत्पत्तीची अंतिम सत्यता जाणून घ्यायची आहे, त्यामागील कारण काहीही असो आणि कोरोना विषाणूचे मूळ जाणून घेणे आमचे सर्वात मोठे प्राधान्य आहे.’
डॉ. फौची यांनीही चौकशीची मागणी केली
अमेरिकेच्या एपिडेमिओलॉजिस्ट आणि जगप्रसिद्ध डॉक्टर अँथनी फौची यांनीही कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या तपासणीची जोरदार मागणी केली आहे. डॉ. अँथनी फौची म्हणाले की, ‘आम्हाला नक्की वाटतेय की, तपास योग्य दिशेने नेला पाहिजे. डब्ल्यूएचओ जो तपास करत आहे तो पुढच्या पातळीवर नेला पाहिजे. कारण आम्हाला 100 टक्के हे माहिती नाही की, कोरोना विषाणूचा जन्म कसा झाला? यामुळे याबाबीची निष्पक्ष चौकशी अत्यंत गरजेची आहे.
US slams China on the origin of Corona, White House scientists say, it is necessary to reveal the truth of China
महत्त्वाच्या बातम्या
- इंडियन मेडिकल असोसिएशनचा रामदेव बाबांविरुद्ध १००० कोटींचा मानहानीचा दावा, म्हणाले- लेखी माफी मागा!
- सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’
- पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद
- 7 Years Of Modi Government : पीएम मोदींच्या ७ वर्षांच्या सत्तेतील देशात आमूलाग्र बदल करणारे ७ महत्त्वाचे निर्णय
- Coronavirus Cases in India : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ, २४ तासांत २.०८ लाख रुग्णांची नोंद, ४१५७ मृत्यू