वृत्तसंस्था
काबुल : काबूल विमानतळ परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्याला अमेरिकेने तातडीने हवाई हल्ले करून उत्तर दिल्याचे वृत्त आहे. त्यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. US says it carried out strike in jalalabaad after rocket hits residential area of kabul
काबूल विमानतळ परिसरातील खाजेह बागरा या निवासी भागात एका घरावर रॉकेट डागण्यात आले आहेत. ज्या घरात हे रॉकेट पडले त्या घरातील एका मुलाचा मृत्यू तर तीन जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या हल्ल्याला अमेरिकेने हवाई हल्ले चढवून जशास तसे उत्तर दिले.
अमेरिकेने जलालाबादजवळच्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हे हवाई हल्ले रॉकेट हल्ल्यानंतर चढविले आहेत. त्यात आयएसआयएस खोरासनचे दोन
दहशतवादी ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
विमानतळ परिसर बनणार युद्धाचे रणांगण ?
काबूल विमानतळाचा परिसर आता युद्धाचे रणांगण बनण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेने ३१ ऑगस्ट या दिवशी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची घोषणा यापूर्वी केली. परंतु, आता तातडीने सैन्य मागे घेता येणार नसल्याचे सांगितले. तसेच विमानतळ ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे दहशतवादी चवताळले आहेत.
त्यांनी अमेरिकेला पिटाळून लावण्यासाठी आणि विमानतळ अमेरिकन सैन्य मुक्त करण्यासाठी थेट या परिसरात बॉम्ब हल्ले आणि आता रॉकेट हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याबाबतचे अमेरिकेकडून देण्यात येत असलेले इशारे आणि केले जाणारे ड्रोन आणि हवाई हल्ले पाहता अमेरिका आणि दहशतवादी यांची लढाई लवकर थांबण्याची शक्यता नाही.
US says it carried out strike in jalalabaad after rocket hits residential area of kabul
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परबांना ED ची नोटीस; संजय राऊतांनी आज म्हटलेय, chronology समज लिजीये, परंतु, किरीट सोमय्यांनी पूर्वीच दिला होता इशारा!!
- अफगाणिस्तानारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी जागरूक रहा, भाजपचे प्रभारी सी.टी. राव यांचे आवाहन
- टोकियो पॅराऑलिंपिकमध्ये आणखी दोन पदकांचा धमाका; निशाद कुमारला उंच उडीत रौप्य पदक तर, विनोद कुमारला थाळी फेकीत ब्राँझ पदक
- अनिल परब यांना ED ची नोटीस; संजय राऊतांचं ट्विट ; ‘शाब्बास’