• Download App
    इस्त्राएलचे सुरक्षा कवच आयर्न डोमला नवी झळाळी, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे आश्वासन|US President Joe Biden reassures to replenish Israel's Iron Dome

    इस्त्राएलचे सुरक्षा कवच आयर्न डोमला नवी झळाळी, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे आश्वासन

    दहशतवादी संघटना हमासच्या हजारो क्षेपणास्त्रांना निकामी करणाºया इस्त्राएलच्या आयर्न डोम एआर डिफेन्स सिस्टिमला नवी झळाळी मिळणार आहे. ही यंत्रणा नव्याने उभारण्यासाठी अमेरिका मदत करेल असे आश्वासन अध्यक्ष ज्योबायडेन यांनी दिले आहे.US President Joe Biden reassures to replenish Israel’s Iron Dome


    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : दहशतवादी संघटना हमासच्या हजारो क्षेपणास्त्रांना निकामी करणाऱ्या इस्त्राएलच्या आयर्न डोम एआर डिफेन्स सिस्टिमला नवी झळाळी मिळणार आहे. ही यंत्रणा नव्याने उभारण्यासाठी अमेरिका मदत करेल असे आश्वासन अध्यक्ष ज्योबायडेन यांनी दिले आहे.

    बायडेन म्हणाले, इस्त्राएलचे पंतप्रधान बेन्यामीन नेत्याहूल यांच्याशी माझी चर्चा आहे. त्यांनी आयर्न डोम यंत्रणेबाबत मला सांगितले. अमेरिका आणि इस्त्राएलच्या संयुक्त संशोधनातून ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे.



    ही यंत्रणा आणखी मजबूत करण्यासाठी अमेरिका मदत करेल. कारण याच यंत्रणेमुळे इस्त्राएलच्या अरब आणि ज्यू नागरिकांचे प्राण वाचले आहेत.
    हमासने सात दिवसांत केलेल्या हजारो रॉकेट हल्ल्यांपैकी ८० ते ९० टक्के हल्ले ‘आयर्न डोम’ या हवाई हल्ला प्रतिरोधक संरक्षक छत्राने निष्क्रीय केले.

    यामुळे गाझाच्या तुलनेत इस्रायलमध्ये कमी हानी झाली. हमासने ५० टक्क्यांपेक्षा जास्त हल्ल्यांसाठी इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अविव या शहराला लक्ष्य केले.

    मात्र इस्रायलच्या आयर्न डोम या हवाई हल्ला प्रतिरोधक संरक्षक छत्राने हमासचे बहुसंख्य हल्ले निष्क्रीय केले.इजिप्तच्या मध्यस्तीने द्विपक्षीय चर्चेस इस्त्राएलच्या मंत्रीमंडळाने एकमताने मान्यता दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे हे वक्तव्य आले आहे.

    युध्दबंदीचे आपण स्वागत करतो असे सांगून ते म्हणाले, पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या नुकसानीच्याा पार्श्वभूमीवर तेथेही नव्याने उभारणीसाठी अमेरिका मदत करेल. मानवतावादी दृष्टिकोनातून गाझापट्टीतील नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल.

    US President Joe Biden reassures to replenish Israel’s Iron Dome

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या