वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेत 5 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा मुलगा हंटर बायडेन याला 7 दिवसांच्या खटल्यानंतर गन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. डेलावेअर न्यायालयाने हंटरला दोषी ठरवले आहे.US President Biden’s son Hunter convicted in gun case; 25 years in prison possible
अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या मुलाला न्यायालयाने दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हंटरवर बंदूक परवान्यासाठी अर्ज करताना त्याच्या अमली पदार्थांच्या व्यसनाची माहिती लपवल्याचा आरोप आहे.
हंटरला दोषी ठरविल्यानंतर 120 दिवसांच्या आत शिक्षा जाहीर केली जाऊ शकते. त्याला 25 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. 4 दिवसांपूर्वी फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना बायडेन म्हणाले होते की, जर त्यांचा मुलगा बंदुकीच्या खटल्यात दोषी आढळला तर ते त्याला कधीही माफ करणार नाहीत.
120 दिवसांत शिक्षा जाहीर होऊ शकते
हंटर दोषी आढळलेल्या 3 प्रकरणांपैकी 2 प्रकरणांमध्ये 10-10 वर्षे तर तिसऱ्या प्रकरणात 5 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. फेडरल मार्गदर्शक तत्त्वांच्या शिफारशींचे पालन करून, शिक्षा कमी करणे किंवा वाढवणे हे न्यायाधीशांवर अवलंबून आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, ज्या व्यक्तीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि कोणत्याही गुन्ह्यात फसवणूक करून खरेदी केलेले शस्त्र वापरले नाही अशा व्यक्तीला सामान्यतः कमी शिक्षा मिळते. ती 15 ते 21 महिन्यांची असू शकते. प्रत्येक प्रकरणात त्याला 2 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
हंटरला 120 दिवसांत (4 महिने) शिक्षा होऊ शकते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हंटरच्या शिक्षेचा निर्णय अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी घेतला जाईल.
हंटरला कोणत्या आरोपांचा सामना करावा लागला?
ऑक्टोबर 2018 मध्ये हंटर बायडेनवर कोल्ट कोब्रा हँडगन खरेदी करताना खरी माहिती लपवल्याचा आरोप आहे. त्यावेळी त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते आणि तो नियमितपणे अंमली पदार्थांचे सेवन करत होता. बंदूक खरेदी करण्यासाठी त्याने कागदपत्रात चुकीची माहिती दिली होती. खरं तर, अमेरिकन कायद्यानुसार, ड्रग्ज सेवन करणाऱ्या व्यक्तीकडे बंदूक किंवा कोणतेही घातक शस्त्र असू शकत नाही.
हंटर बायडेनची एक्स गर्लफ्रेंड हेलीने कोर्टात मोठे वक्तव्य केले होते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हेलीने सांगितले की, जेव्हा तिने हंटरच्या कारची झडती घेतली तेव्हा तिला तिथे एक बंदूक सापडली, ज्यामुळे ती घाबरली. तिने हंटरला अनेक वेळा ड्रग्ज घेताना पकडल्याचेही हेलीने कोर्टात सांगितले.
हंटरमुळेच तिलाही अमली पदार्थांचे व्यसन जडल्याचे हेलीने न्यायालयात सांगितले होते. हेलीने ऑगस्ट 2018 मध्ये ड्रग्ज घेणे बंद केले. हंटरने आपल्या ‘ब्युटीफुल थिंग्ज’ या आठवणीतील खुलासा केला होता की, भाऊ ब्यूच्या मृत्यूनंतर तिला कोकेनचे व्यसन होते आणि नंतर या व्यसनातून मुक्त होण्यासाठी तिला एक वर्ष उपचार घ्यावे लागले.
US President Biden’s son Hunter convicted in gun case; 25 years in prison possible
महत्वाच्या बातम्या
- अभिनेता नसीरुद्दीन शाहचा मुस्लिमांना सल्ला- सानियाचा स्कर्ट सोडून शिक्षणाचं बघा, पीएम मोदींना जाळीदार टोपी घातलेले पाहायचंय!
- शरद पवारांचा सरकार बदलण्याचा एल्गार, पण रोहित पवारांचा फक्त डबल डिजीट आमदार निवडून आणण्याचा निर्धार!!
- खलिस्तानी फुटीरांकडून इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; मोदींच्या दौऱ्यापूर्वी अडथळ्याचा डाव!!
- पेमा खांडू हेच होणार अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री!