• Download App
    अमेरिकेने मानसिकता आणि धोकादायक धोरणे बदलावीत - चीनचा सज्जड इशारा US must change its mindset and its dangerous policies

    अमेरिकेने मानसिकता आणि धोकादायक धोरणे बदलावीत – चीनचा सज्जड इशारा

    विशेष प्रतिनिधी

    बिजींग – चीनबरोबरील संबंध बिघडण्यास अमेरिकाच कारणीभूत असून त्यात सुधारणा करण्यासाठी अमेरिकेने त्यांची पूर्वग्रहदूषित मानसिकता आणि धोकादायक धोरणे बदलणे आवश्‍यक आहे, असे चीनने म्हटले आहे. US must change its mindset and its dangerous policies

    अमेरिकेच्या परराष्ट्र राज्यमंत्री वेंडी शेरमन या आज चीनमध्ये दाखल झाल्या. त्यापूर्वीच चीनने टीका केली. चीनचे परराष्ट्र राज्यमंत्री फेंग म्हणाले, आपण दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, या भूमिकेतून अमेरिका इतर देशांशी वागत असते. त्यांचा हा दृष्टीकोन आम्हाला मान्य नाही. दुसऱ्या देशांना समान वागणूक देणे अमेरिकेने शिकून घ्यावे, अन्यथा त्यांना तसा धडा शिकविण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदाय स्वीकारेल.



    ते म्हणाले, चीनचा विकास रोखण्याचा आणि अडथळे आणण्याचा बायडेन सरकारचा प्रयत्न आहे. चीन हा आपला शत्रू आहे, अशी पक्की समजूत अमेरिकेने करून घेतली असल्याने संबंध सुधारण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वाद दूर करतानाच एका समान पातळीवरून दोन देशांमध्ये चर्चा व्हावी, अशी चीनची अपेक्षा आहे.

    US must change its mindset and its dangerous policies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Xi Jinping : ब्राझीलमधील ब्रिक्स परिषदेला जिनपिंग जाणार नाहीत; PM मोदींना स्टेट डिनरच्या आमंत्रणाने चिनी राष्ट्रपती नाराज

    Indians Iran Evacuation Halted : इराणमधून भारतीयांचे स्थलांतर थांबले; इस्रायल- इराण युद्धबंदीनंतर निर्णय; दूतावासाची परिस्थितीवर नजर

    NATO Summit : नाटो शिखर परिषदेत ट्रम्प यांच्या अजेंड्याला विरोध; स्पेनचा संरक्षण खर्च वाढवण्यास नकार