वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेची तीन एफ 15 विमाने नष्ट झाली, म्हणून इराण विरुद्धची मोहीम थांबणार नाही. ही मोहीम जशीच्या तशी नियोजित वेळेनुसारच सुरू राहील. त्यात कुठलाही अडथळा येणार नाही, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे लष्कर प्रमुख जॉईन्ट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल डॅन रायझिंग कॅन यांनी दिला. तीन अमेरिकन फायटर जेट या युद्धात पडल्याची पहिल्यांदाच कबुली अमेरिकेने दिली. पण त्याच वेळी जनरल केन यांनी इराणविरुद्धची मोहीम थांबणार नसल्याचा निर्वाळा दिला. अमेरिकन सैन्य गरजेनुसार इराणविरोधात आणखी फ्रंट सुद्धा उघडेल. इराण विरुद्धची मोहीम लवकरात लवकर संपविण्यासाठी अमेरिका आपल्या सैनिकी ताकदीचा जास्तीत जास्त वापर करेल, असा इशाराही जनरल केन यांनी दिला.US military chief warns that US campaign against Iran will not stop even if three planes are destroyed
युवराज रेझा पहलवी कोणत्याही क्षणी इराण मध्ये जायला तयार
अमेरिका आणि इजरायल यांनी इराणवर हल्ला करून इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्लाह खामेनी याला संपविल्यानंतर तिथे इस्लामिक राजवट बदलायची नांदी झाली असून इराणचे युवराज रेझा पहलवी कोणत्याही क्षणी इराणमध्ये जायला तयार झालेत. त्यांनी स्वतःच फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आपण इराणमध्ये जायला उत्सुक असल्याचे सांगितले.
इराण मध्ये 1972 मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर पहलवी कुटुंबीयांनी अमेरिकेत आश्रय घेतला. रेझा पहलवी हे इराणचे युवराज असून ते इराणच्या राजगादीचे वारस आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याचे रेझा पहलवी समर्थन केले असून इराणमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आपण उत्सुक आहोत. आपली लोकशाहीवादी इराणचे नेतृत्व करण्याची तयारी आहे तिथले सगळे निर्बंध हटवून एक धर्मनिरपेक्ष इराण प्रस्थापित करण्यासाठी आपण योगदान देऊ इच्छितो असे रेझा पहलवी यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
इराण मधल्या इस्लामिक राजवटीने त्या देशाचे फार नुकसान केले. त्यांनी कोट्यावधी इराणी नागरिकांना बंधक बनविले. त्यांचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. इराणला जगापासून तोडून टाकले. इराणची मुळात अशी जगापासून तुटायची संस्कृतीच नाही. इराण ने कायम जगाला प्रकाश दाखविला. तिथल्या इस्लामिक राजवटीचा शेवट झाला की ताबडतोब आपल्याला तिथे जायचे आहे तिथल्या लोकशाहीवादी लोकांना भेटायचे आहे इराणमध्ये लोकशाही राजवट प्रस्थापित करून तिचे नेतृत्व करायचे आहे, असे वक्तव्य रेझा पहलवी यांनी केले.
US military chief warns that US campaign against Iran will not stop even if three planes are destroyed
महत्वाच्या बातम्या
- इराण वरील हल्ला जितका अमेरिकन वर्चस्ववादाचा नमुना; तितकाच तो इस्लामी दहशतवादाला दणका!!
- West Bengal : बंगाल SIR- अंतिम यादीत 7.04 कोटींहून अधिक मतदार; 61 लाख लोकांची नावे वगळली
- अमेरिकेच्या इराण वरच्या हल्ल्यामुळे चीनचा लष्करी, आर्थिक आणि तंत्रज्ञानातल्या वर्चस्वाचा फुटला फुगा!!
- Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास; गोविंद फड यांची मनोज जरांगेंना थेट धमकी