WHA Meeting : कोरोना महामारीवरील अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानंतर, आज होणाऱ्या वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीच्या (WHA) बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत अशा प्रकारच्या महामारीपासून भविष्यात बचाव करण्यासाठी देशांना कायदेशीर जबाबदार ठरवण्यावर मोहोर उमटू शकते. US Intel Reports Suggest that Coronavirus Spread Through Wuhan Lab, Now WHA Meeting likely to Discuss
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीवरील अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानंतर, आज होणाऱ्या वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीच्या (WHA) बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या बैठकीत अशा प्रकारच्या महामारीपासून भविष्यात बचाव करण्यासाठी देशांना कायदेशीर जबाबदार ठरवण्यावर मोहोर उमटू शकते. तथापि, अमेरिकी गुप्तचर अहवालात सांगण्यात आले आहे की, चीनने जेव्हा कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण नोंदवला होता की, त्यापूर्वी एक महिना आधी वुहानच्या संशोधन प्रयोगशाळेतील संशोधक आजारी पडले होते, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
हा गुप्तचर अहवाल आल्यानंतर कोरोनाचा विषाणू चीनमधील वुहान लॅबमधूनच जगभरात पसरला या दाव्याने पुन्हा एकदा जोर धरला आहे. WHAच्या बैठकीत आंतर सरकारी कार्यकारी समितीदेखील स्थापन केली जाऊ शकते. कोरोनो विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या तीन अहवालांची चौकशी करणे या समितीचे काम आहे. याव्यतिरिक्त जागतिक महामारी संधीवरही विचार केला जाऊ शकतो.
तथापि, जिनिव्हामध्ये उपस्थित मुत्सद्दींच्या म्हणण्यानुसार, डब्ल्यूएचएच्या बैठकीकडून जास्त अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे. या बैठकीत डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांना कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल दुसऱ्या टप्प्यातील चौकशी सुरू करण्यास सांगितले जाऊ शकते. यापूर्वी डब्ल्यूएचओने आपल्या तपासात चीनच्या वुहान लॅबला क्लीन चीट दिली होती.
ही बैठक भूतानच्या अध्यक्षतेखाली होत आहे. आतापर्यंत जगभरात 16 कोटी लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि यामुळे 34 लाख जणांनी आपला जीव गमावला आहे.
US Intel Reports Suggest that Coronavirus Spread Through Wuhan Lab, Now WHA Meeting likely to Discuss
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांच्या भरपाईची याचिकेद्वारे मागणी, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मागितले उत्तर
- Yellow Fungus : काळ्या-पांढऱ्या बुरशीपेक्षाही धोकादायक पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळला, जाणून घ्या लक्षणे
- Corona Vaccination : 18 ते 44 वयोगटासाठी ऑनसाइट रजिस्ट्रेशनची सुविधा, जाणून घ्या नवे नियम
- प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांकडून पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणांचे कौतुक, केंद्र सरकारला दिले 10 पैकी 9 गुण
- संतापजनक : बिलामध्ये 11 हजार कमी पडल्यावर हॉस्पिटलने घेतले रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र