विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अमेरिकेतील ज्यो बायडेन सरकारने व्हिसा नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, एच-१ बी व्हिसाधारकांच्या पतीला किंवा पत्नीला अमेरिकेत नोकरी करण्याच्या त्यांच्या परवान्याला आपोआप मंजुरी मिळणार आहे. याचा अमेरिकेतील भारतीयांना मोठा फायदा होणे शक्य आहे.US Indians get relief regarding visa issue
एच ४ व्हिसाच्या आधारे नोकरी करणाऱ्यांना या व्हिसाचा कालावधी वाढवून घेण्यासाठी नियमित कालावधीने अर्ज करावा लागतो. अनेकदा अशा अर्जांना मंजुरी मिळण्यात विलंब होत असल्याने अनेकांना चांगल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
या प्रकाराविरोधात अमेरिकेतील स्थलांतरीतांसाठी काम करणाऱ्या एका संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या संघटनेच्या बाजूने निकाल दिला आहे.अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय तंत्रज्ञ आहेत.
विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींना अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी म्हणून दिला जणाऱ्या एच-१ बी व्हिसाचा फायदा घेत लाखो भारतीय अमेरिकेत रहात आहेत. अशा वेळी त्यांच्या पत्नी किंवा पतीलाही नोकरी करता यावी, यासाठी एच-४ व्हिसा दिला जातो. यासाठी त्यांना वेगळा अर्ज करावा लागतो. या अर्जाचे वारंवार नूतनीकरणही करावे लागते. ही प्रक्रिया आता सुलभ होणार असून नूतनीकरण आपोआप होणार आहे.
US Indians get relief regarding visa issue
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात भाजपाच सत्ता राखणार, सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळेच यश, योगी आदित्यनाथांच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती
- गोवा, मणिपूरमध्ये भाजपच मारणार बाजी, कॉँग्रेसपेक्षा आपला जादा पसंती
- पंजाबमध्ये कॉँग्रेसला पराभवाचा धक्का बसणार, आप मारणार विधानसभा निवडणुकीत बाजी
- सध्याच्या राजकारणात पोरखेळ, राज्यात बिग बॉसचा शो सुरू, पंकजा मुंडे यांची टीका
- एनसीबीचे उपमहासंचालक म्हणाले यंत्रणा स्वच्छ करायचीय, समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते