विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तान मधील सामान्य जनतेला गंभीर मानवतावादी संकटाचा सामना करवा लागतो आहे. शिक्षण, उद्योग अश्या बऱ्याच गोष्टींवर परिणाम झालेला दिसून येतोय. म्हणून तेथील लोकांना मदत करण्यासाठी अमेरिकेने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 14. 4 करोड डॉलर ची मदत अमेरिका करेल.
US government to help people in Afghanistan
युनायटेड नेशन्सचे हाय कमिश्नर फॉर रिफ्युजीज (UNHCR), युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF), इंटरनॅशनल द ऑर्गनायझेशन यासह स्वतंत्र आंतरराष्ट्रीय आणि गैर-सरकारी मानवतावादी संस्थांना ही थेट मदत पुरवली जाईल, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी सांगितले.
ब्लिंकेन म्हणाले, “हा निधी या प्रदेशातील 18 दशलक्षाहून अधिक गरजू अफगाण लोकांना थेट मदत करेल. त्याचप्रमाणे शेजारील देशांमध्ये आश्रय घेत असलेल्या अफगाण निर्वासितांना देखील या निधीचा फायदा मिळणार आहे.”
परराष्ट्र मंत्री म्हणाले, ‘ही मदत आमच्या भागीदारांना आवश्यक जीवन सुरक्षा, अन्न सुरक्षा, अत्यावश्यक आरोग्य सेवा, आरोग्य सेवेच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मानवी गरजा, कोविड-19, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.
US government to help people in Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
- NCRB Report : शेतकरी आत्महत्यांमध्ये 2020 मध्ये १८ % वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
- नवाब मलिकांच्या आरोपांवर एनसीबीचेही प्रत्युत्तर, एखाद्याविरुद्ध कारवाई करायला सांगणारे तुम्ही कोण?
- देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला ; म्हणाले – राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?
- ‘फेसबुक’चे नाव बदलल्याने युजर्ससाठी नेमकं काय-काय बदलणार? मार्क झुकेरबर्गने काय सांगितले! वाचा सविस्तर…