• Download App
    भारताने केलेल्या मदतीचा अमेरिकेला विसर, आता दबावामुळे बायडेन प्रशासनाकडून मदतीचा हात पुढे । US Forgot help Of HCQ given by India in Covid 19 pandemic, now due to pressure the Biden administration extends a helping hand

    भारताने केलेल्या मदतीचा अमेरिकेला विसर, आता दबावामुळे बायडेन प्रशासनाकडून मदतीचा हात पुढे

    Biden administration : कोरोना महामारीचा भारतात सर्वात मोठा उद्रेक सुरू आहे. यादरम्यान कोरोनापासून संरक्षणासाठी लसीकरणही सुरू आहे. परंतु लसीच्या निर्मितीला लागणारा कच्चा माल पुरवण्यास अमेरिकेने बंदी घातली आहे. बायडेन प्रशासनाने कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध घातलेले आहे. यामुळे भारताने त्यांना विनंती करून बायडेन प्रशासन अमेरिका फर्स्टचा अट्टहास घेऊन बसले आहे. US Forgot help Of HCQ given by India in Covid 19 pandemic, now due to pressure the Biden administration extends a helping hand


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीचा भारतात सर्वात मोठा उद्रेक सुरू आहे. यादरम्यान कोरोनापासून संरक्षणासाठी लसीकरणही सुरू आहे. परंतु लसीच्या निर्मितीला लागणारा कच्चा माल पुरवण्यास अमेरिकेने बंदी घातली आहे. बायडेन प्रशासनाने कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध घातलेले आहे. यामुळे भारताने त्यांना विनंती करून बायडेन प्रशासन अमेरिका फर्स्टचा अट्टहास घेऊन बसले आहे.

    याच वेळी अमेरिका हे विसरली की, कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा अमेरिका जेरीस आलेली होती, तेव्हा उपचारांसाठी उपयोगी पडणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा भारताने त्यांना केला होता. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी मोदी सरकारने आभारही मानले होते. आता मात्र अमेरिकेने मदत नाकारल्याने बायडेन प्रशासनावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. अमेरिकीतील भारतवंशीयांनी समाजमाध्यमावर भारताला मदत करण्यासाठी मोहीम चालवून बायडेन सरकारवर दबाव आणला आहे. याचीच परिणती म्हणून रविवारी एकाच दिवसात बायडेन सरकारमधील दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी भारताला मदतीचे आश्वासन दिले आहे.

    अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकेन यांनी ट्वीट करून म्हटलंय की, कोरोना उद्रेकाच्या या काळात आम्ही भारतीयांसोबत आहोत. आम्ही आमच्या भारतीय भागीदारांसोबत यासाठी जवळून काम करत आहोत. याशिवाय भारतीय नागरिक आणि भारतीय कोविड योद्ध्यांना आम्ही अधिकची मदत देण्यासाठी तातडीने प्रयत्न करत आहोत.

    दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सचिव जेक सुलिव्हन यांनीही ट्वीट केले की, भारतातील कोरोना उद्रेकामुळे अमेरिकाही संवेदनशील आहे. आम्ही या काळात भारतीयांना मदत करण्यासाठी अधिकची मदत पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकची माहिती लवकरच…

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर भारताला निर्यात होणाऱ्या कोरोना लसीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवण्यासाठी दबाव वाढला आहे. शक्तिशाली यूएस चेंबर ऑफ कॉमर्स, अनेक खासदार आणि प्रामुख्याने भारतीय अमेरिकन नागरिकांनी भारताला आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढवला आहे. भारतवंशीयांनीही सोशल मीडियावर याबाबत मोहीम छेडली आहे.

    अमेरिकी चेंबर ऑफि कॉमर्सचे आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष मेरिन ब्रिलियंट म्हणाले की, अॅस्ट्राझेनेकाची लस व इतर वैद्यकीय उपकरणे भारत, ब्राझीलसारख्या देशांना उपलब्ध करण्याचा ही वेळ आहे. ते म्हणाले की, अमेरिकेला आत यांची गरज नसेल. जूनच्या सुरुवातीपर्यंत प्रत्येक अमेरिकी नागरिकाला लस मिळालेली असेल. भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी कोरोनाविरुद्ध युद्धात मदतीचे आवाहन केल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य आले आहे.

    US Forgot help Of HCQ given by India in Covid 19 pandemic, now due to pressure the Biden administration extends a helping hand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण