• Download App
    मोठी बातमी : अमेरिकेत 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, फायझरच्या लसीला मंजुरी । US FDA Approves Pfizer-BioNTech Vaccine For Children 12 To 15 Age Group For Emergency Use

    मोठी बातमी : अमेरिकेत १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, फायझरच्या लसीला मंजुरी

    Pfizer-BioNTech Vaccine For Children :  जगभरात कोरोना महामारीमुळे विध्वंस सुरू असताना या साथीचे आजाराने सर्वाधिक त्रस्त झालेल्या अमेरिकेत आता कोरोनाविरुद्धच्या युद्धात आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (FDA)ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरच्या कोरोना लसीला तातडीची मंजूर दिली आहे. US FDA Approves Pfizer-BioNTech Vaccine For Children 12 To 15 Age Group For Emergency Use


    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : जगभरात कोरोना महामारीमुळे विध्वंस सुरू असताना या साथीचे आजाराने सर्वाधिक त्रस्त झालेल्या अमेरिकेत आता कोरोनाविरुद्धच्या युद्धात आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (FDA)ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरच्या कोरोना लसीला तातडीची मंजूर दिली आहे.

    अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर-बायोएन्टेकच्या कोरोना लसीला तातडीच्या वापरास मान्यता दिली आहे. एफडीएचे कार्यकारी आयुक्त डॉ. जेनेट वुडकोक म्हणाले की, मुलांसाठीही कोविड लस वापरण्याच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर आणण्यात मोठी मदत होणार आहे. आईवडील आणि पालकांनी निश्चिंत होऊन मुलांना ही लस द्यावी, कारण एफडीएने या लसीचे सखोल परीक्षण केले आहे.

    अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यापूर्वी 16 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी फायझरची लस वापरण्यास मंजुरी दिली होती. तथापि, फायझर कंपनीला आढळले की, त्यांची लस लहान मुलांवरही उत्तम परिणामकारक आहे. याची घोषणा एका महिन्यानंतर करण्यात आली. फायझरची दोन डोस असलेली लस आता 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांकरिता आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे.

    भारतातही कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यामुळे सरकारने त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतातील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेदरम्यान लहान मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडेल. अशा परिस्थितीत एफडीएचा लहान मुलांकरिता लसीचा निर्णय दिलासादायक आहे.

    US FDA Approves Pfizer-BioNTech Vaccine For Children 12 To 15 Age Group For Emergency Use

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले- NCPच्या विलीनीकरणाचा कोणताही मुद्दा नव्हता; सुनेत्रा पवारांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य

    NSA Ajit Doval : डोभाल यांच्या बॅकडोअर डिप्लोमसीमुळे झाली अमेरिकेशी ट्रेड डील; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना म्हटले होते- झुकणार नाही, ट्रम्प पद सोडण्याची वाट पाहावी लागली तरी

    Yumnam Khemchand Singh : युमनाम खेमचंद सिंह बनले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री; नागा समुदायाचे लोसी दिखो-कुकीमधून नेमचा किपगेन बनले उपमुख्यमंत्री