Pfizer-BioNTech Vaccine For Children : जगभरात कोरोना महामारीमुळे विध्वंस सुरू असताना या साथीचे आजाराने सर्वाधिक त्रस्त झालेल्या अमेरिकेत आता कोरोनाविरुद्धच्या युद्धात आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (FDA)ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरच्या कोरोना लसीला तातडीची मंजूर दिली आहे. US FDA Approves Pfizer-BioNTech Vaccine For Children 12 To 15 Age Group For Emergency Use
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : जगभरात कोरोना महामारीमुळे विध्वंस सुरू असताना या साथीचे आजाराने सर्वाधिक त्रस्त झालेल्या अमेरिकेत आता कोरोनाविरुद्धच्या युद्धात आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (FDA)ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरच्या कोरोना लसीला तातडीची मंजूर दिली आहे.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर-बायोएन्टेकच्या कोरोना लसीला तातडीच्या वापरास मान्यता दिली आहे. एफडीएचे कार्यकारी आयुक्त डॉ. जेनेट वुडकोक म्हणाले की, मुलांसाठीही कोविड लस वापरण्याच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर आणण्यात मोठी मदत होणार आहे. आईवडील आणि पालकांनी निश्चिंत होऊन मुलांना ही लस द्यावी, कारण एफडीएने या लसीचे सखोल परीक्षण केले आहे.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यापूर्वी 16 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी फायझरची लस वापरण्यास मंजुरी दिली होती. तथापि, फायझर कंपनीला आढळले की, त्यांची लस लहान मुलांवरही उत्तम परिणामकारक आहे. याची घोषणा एका महिन्यानंतर करण्यात आली. फायझरची दोन डोस असलेली लस आता 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांकरिता आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे.
भारतातही कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यामुळे सरकारने त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतातील कोरोनाच्या तिसर्या लाटेदरम्यान लहान मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडेल. अशा परिस्थितीत एफडीएचा लहान मुलांकरिता लसीचा निर्णय दिलासादायक आहे.
US FDA Approves Pfizer-BioNTech Vaccine For Children 12 To 15 Age Group For Emergency Use
महत्त्वाच्या बातम्या
- Daily Corona Cases in India : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट, मागच्या 24 तासांत 3.29 लाख नव्या रुग्णांची नोंद
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची का? ; मग शेवग्याची भाजी आवश्य खा
- फळांचा राजा आंबा औषधी गुणांची खाण, पक्व फळ हृदयाला हितकर; वात – पित्तशामकही
- कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी दान केला ‘राधे-श्यामचा’ सेट; औषधं-ऑक्सिजन इ.सर्व खर्च करणार अभिनेता प्रभास
- आनंदाची बातमी : ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता पुण्यात ‘कोवॅक्सिन’ लसीचीही निर्मिती !