• Download App
    इस्त्रायल-हमास युद्धात अमेरिकेची एन्ट्री; सीरियात इराण समर्थित दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार 'एयर स्ट्राइक' US entry into Israel Hamas war Heavy air strike on locations of Iran  backed terrorists in Syria

    इस्त्रायल-हमास युद्धात अमेरिकेची एन्ट्री; सीरियात इराण समर्थित दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार ‘एयर स्ट्राइक’

    अमेरिकेनेही मध्यपूर्वेत ९०० सैनिक पाठवले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, अमेरिकन सैन्याने पूर्व सीरियातील इराण समर्थित इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या दोन तळांवर स्वसंरक्षणार्थ हल्ला केला आहे. इराक आणि सीरियातील अमेरिकन हवाई तळांवर सातत्याने होत असलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेनेही मध्यपूर्वेत ९०० सैनिक पाठवले आहेत. US entry into Israel Hamas war Heavy air strike on locations of Iran  backed terrorists in Syria

    अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले- ’17 ऑक्टोबरपासून इराण समर्थित दहशतवादी संघटनेने इराक आणि सीरियामधील अमेरिकन एअरबेसवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे, ज्यात आतापर्यंत २१ सैनिक जखमी झाले आहेत.  राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासाठी अमेरिकन सैनिकांच्या सुरक्षेपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही आणि त्यांनी आदेश दिले आहेत की अमेरिका आपले सैनिक आणि आपल्या हिताचे  रक्षण करण्यासाठी उभी राहील आणि त्याविरुद्ध कोणताही हल्ला सहन करणार नाही.

    ते पुढे म्हणाले की, ‘अमेरिकेला विद्रोह नको आहे आणि अशा प्रकरणात अडकण्याचीही इच्छा नाही, पण इराण समर्थित दहशतवाद्यांकडून अमेरिकन सैनिकांवर झालेला हल्ला अजिबात मान्य नाही आणि तो थांबवणे गरजेचे झाले आहे.  पाठीमागे लपून आपण  हल्ला करू शकतो, असे इराणला वाटत असेल, तर आम्ही तसे होऊ देणार नाही. जर अमेरिकन सैन्यावर इराण समर्थित दहशतवाद्यांचा  हल्ला असाच सुरू राहिला तर आम्ही आमच्या लोकांना वाचवण्यासाठी कोणतेही घातक पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही.

    US entry into Israel Hamas war Heavy air strike on locations of Iran  backed terrorists in Syria

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या