• Download App
    संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने काबूल हल्यावरील निषेधाच्या पत्रकातून तालीबानचा संदर्भ वगळला, अध्यक्ष म्हणून भारतानेही केली सही|UNSC Skips Taliban Mention in Terror Statement

    संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने काबूल हल्यावरील निषेधाच्या पत्रकातून तालीबानचा संदर्भ वगळला, अध्यक्ष म्हणून भारतानेही केली सही

    विशेष प्रतिनिधी

    जिनेव्हा : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने काबूल हल्यावरील निषेधाच्या पत्रकातून तालीबानचा संदर्भ वगळला आहे. अफगाणिस्तानच्या गटांनी इतर कोणत्याही देशात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देऊ नये असे आवाहनही केले आहे.UNSC Skips Taliban Mention in Terror Statement

    या महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यावर अध्यक्ष म्हणून भारताने सही केली आहे. विशेष म्हणजे 16 आॅगस्ट रोजी अफगाणिस्तानबाबत काढलेल्या निवेदनात, सुरक्षा परिषदेने वेगळी भूमिका स्वीकारली होती. “तालिबान किंवा इतर कोणत्याही अफगाणिस्तान समूहाने किंवा व्यक्तीने इतर कोणत्याही देशाच्या भूभागावर कार्यरत दहशतवाद्यांना समर्थन देऊ नये, अशी ताकीद दिली होती.



    तालिबान नेतृत्वाकडे भारत कशा पध्दतीने पाहतो यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
    दरम्यान, तालिबानने म्हटले आहे की त्यांना अफगाणिस्तानमधील भारताचे प्रकल्प कधीच समस्या नव्हती.

    ते अशरफ घनीच्या कठपुतळी सरकारकडून त्यांना दिल्या जात असलेल्या पाठिंब्याला विरोध करत होते, असे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे.

    UNSC Skips Taliban Mention in Terror Statement

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या