• Download App
    खलिस्तान समर्थकांकडून सॅन फ्रॅनसिस्कोमधील भारतीय दूतावासाला आग लावण्याचा प्रयत्न; अमेरिकेने नोंदवला निषेध! United States  A group of Khalistan radicals on July 2 set Indian Consulate on fire in San Francisco

    खलिस्तान समर्थकांकडून सॅन फ्रॅनसिस्कोमधील भारतीय दूतावासाला आग लावण्याचा प्रयत्न; अमेरिकेने नोंदवला निषेध!

    ‘एफबीआय’ने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेने रविवारी (२ जुलै) सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात खलिस्तान समर्थकांनी केलेल्या जाळपोळीच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. खलिस्तानी कट्टरपंथीयांनी पहाटे दीड ते अडीच या वेळेत भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावण्याचा प्रयत्न केला, पण सॅन फ्रान्सिस्को अग्निशमन विभागाने तातडीने आग विझवली, अशी माहिती अमेरिकेतील स्थानिक वृत्तवाहिनी दिया टीव्हीने दिली आहे. United States  A group of Khalistan radicals on July 2 set Indian Consulate on fire in San Francisco

    आगीमुळे दूतावासाचे फारसे नुकसान झाले नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर सुदैवाने या घटनेत एकाही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. खलिस्तान समर्थकांनी या घटनेचा व्हिडिओही जारी केला आहे.

    सिख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने ८ जुलैपासून परदेशातील भारतीय दूतावासांना घेराव घालण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे. एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

    United States  A group of Khalistan radicals on July 2 set Indian Consulate on fire in San Francisco

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप