विशेष प्रतिनिधी
ढाका – म्यानमारमधून बांगलादेशात निर्वासित म्हणून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या संरक्षणासाठी आणि व्यवस्थापनासाठी संयुक्त राष्ट्रे आणि बांगलादेशदरम्यान सामंजस्य करार झाला आहे. बांगलादेशने हजारो रोहिंग्या मुस्लिमांना बंगालच्या उपसागरातील भसान चार या बेटावर ठेवले आहे.UN will bats for rohingya muslims
म्यानमारमधील लष्कराच्या अत्याचाराला कंटाळून लाखो रोहिंग्या मुस्लिमांनी इतर देशांमध्ये निर्वासित म्हणून आश्रय घेतला आहे. त्यातील बहुसंख्य, म्हणजे सुमारे ११ लाख लोक बांगलादेशात आले आहेत.
यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ लागल्याने आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नह निर्माण होऊ लागल्याने बांगलादेश सरकारने रोहिंग्यांना एका बेटावर विस्थापित करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार भसान चार बेटावर आतापर्यंत १९ हजार रोहिंग्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या बेटावरील रोहिंग्यांना संरक्षण आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी बांगलादेश सरकारने संयुक्त राष्ट्रांबरोबर करार केला आहे.बांगलादेशमधील कॉक्स बझार जिल्ह्यात निर्वासित रोहिंग्यांसाठी छावण्या उभारण्यात आल्या असून या छावण्यांमधील एक लाख निर्वासितांचे भसान चार बेटावर पुनर्वसन करण्याचा बांगलादेश सरकारचा विचार आहे.
हे बेट राहण्यासाठी योग्य नसल्याचे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे. मात्र, ११ कोटी डॉलर खर्च करत बेटावर बऱ्याच सुधारणा केल्या असल्याचा दावा बांगलादेश सरकारने केला आहे.
UN will bats for rohingya muslims
महत्त्वाच्या बातम्या
- Cruise Drugs Case : आर्यन खान बनला कैदी नंबर 956, खान कुटुंबाने मनी ऑर्डरने तुरुंगात पाठवले 4500 रुपये
- पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या 7 नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ’15-20 वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- मंदिर-मंडपांवर हल्ल्यातील सहभागींना सोडले जाणार नाही, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिपादन
- Elgaar Parishad case : वरवरा राव यांना 28 ऑक्टोबरपर्यंत सरेंडर करण्याची गरज नाही – मुंबई उच्च न्यायालय