• Download App
    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्किंनी केली मदतीची मागणी|Ukrainian President Zhelezkin has called for help

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्किंनी केली मदतीची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    क्रेन : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीसाठी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. आतापर्यंत युक्रेनला ठोस मदत करण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याने युक्रेनची अवस्था दिवसेदिवस बिकट होत चालली होती.Ukrainian President Zhelezkin has called for help

    रशियाकडून युक्रेवर सतत हल्ले चढवण्यात येत आहेत. या युद्धात अनेक भारतीय नागरिकही अडकले आहे. या युद्धात रणभूमिवर युक्रेनचे अध्यक्ष खुद्द उतरल्याचेही दिसून आले आहे. रशियाकडून सत्त हल्ले होत असल्याने युक्रेन सध्या बेचिराख झाल्याचे दिसून येत आहे.



    अशा परिस्थित भारत एखादी ठोस भूमिका घेऊन या दहशतीतून युक्रेनला बाहेर काढेल. अशी अपेक्षा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आहे. त्यामुळेच त्यांनी मोदींकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.भारताने आतापर्यंत चचेर्तून मार्ग काढण्याचा सल्ला दिला होता.

    मात्र आता मोदी आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या चचेर्नंतर समीकरणं बदलणार का, असाही सवाल उपस्थित झाला आहे. या युद्धात युक्रेनचा अनेक भाग रशियाच्या ताब्यात गेला आहे. आता भारत यात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    या युद्धकाळात युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हताश असल्याचे दिसत आहे. ते हताशपणे सोशल मीडियाचा वापर करत आपल्या देशातील नागरिकाना बळ देण्याचे काम करत आहेत. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर करुन सैनिक आणि देशातील सामान्य नागरिकांना या संकटाला धैयार्ने सामोरे जाऊ या म्हणत ते धीर देत आहेत. या युद्धात युक्रेन लढत राहणार आणि तो हारही मानणार नाही असा संदेश ते सोशल मीडियावरुन देत आहेत.

    Ukrainian President Zhelezkin has called for help

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या