• Download App
    मुलांना कोरोना संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी चीनी लशीचे दोन डोस परिणामकारक|Two doses of Chinese vaccine are effective in protecting children from corona infection

    मुलांना कोरोना संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी चीनी लशीचे दोन डोस परिणामकारक

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग : कोरोना तिसरी लाट व मुलांना साथीचा धोका असल्याची चर्चा जगभरात सुरू मुलांना संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी चीनी लशीचे दोन डोस परिणामकारक असल्याचा दावा लॅन्सेट संसर्गजन्य रोग नियातकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनपर लेखात केला आहे.Two doses of Chinese vaccine are effective in protecting children from corona infection

    तीन वर्षांची बालके ते १७ वर्षांच्या किशोरवयीन मुलांनी कोरोनाप्रतिबंधक ‘कोरोनाव्हॅक’ या चीनने तयार केलेल्या लशीचे दोन डोस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी तयार झाल्याचे दिसून आले.



    यासाठी चीनमधील झाउआंग काउंटीमधील ५५० मुलांवर दोन टप्प्यात चाचणी केली. सिनोव्हॅक कंपनीने उत्पादन केलेल्या ‘कोरोनाव्हॅक’ या लशीचे दोन डोस घेतलेलेल्या ९६ टक्के मुलांमध्ये ‘सार्स-सीओव्ही-२’ या कोरोनाच्या विषाणूविरोधात प्रतिपिंडे विकसित झाल्याचे आढळले.

    या लशीमुळे उद्भतवलेले विपरीत परिणामांचा तीव्रता सौम्य व मध्यम स्वरूपाची होती. इंजेक्शन दिलेल्या जागेवर वेदना होणे हे त्यातील एक सर्वसाधारपणे आढळलेले लक्षण होते, असे ‘सिनोव्हॅक लाइफ सायन्सेस’चे संशोधक क्युआंग गाओ यांनी सांगितले.

    Two doses of Chinese vaccine are effective in protecting children from corona infection

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shehzad Akbar : इम्रान खानच्या सहाय्यकावर ब्रिटनमध्ये हल्ला; नाक आणि जबडा तुटला, असिम मुनीरवर आरोप

    Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची मारहाण करून हत्या; 7 दिवसांत दुसरी घटना

    Yunus Government : हादीची हत्या युनूस सरकारने घडवल्याचा भावाचा आरोप; निवडणूक थांबवण्यासाठी केले; बांगलादेशात 2 महिन्यांत निवडणुका