• Download App
    Trump warns Musk 'जर मस्कने डेमोक्रॅट्सना मदत केली,

    Trump warns Musk : ‘जर मस्कने डेमोक्रॅट्सना मदत केली, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’

    Trump warns Musk

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जुन्या मित्राला उघड धमकी!


    विशेष प्रतिनिधी

    ब्रिजवॉटर – Trump warns Musk अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कर कपात आणि खर्च विधेयकावरून त्यांचे माजी सहकारी व प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्याशी झालेल्या वादात मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी सांगितले की त्यांना त्यांचे संबंध सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही. एवढंच नाहीतर येत्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केल्यास मस्क यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकते, असा सूचक इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.Trump warns Musk

    ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांचा मस्कशी समेट करण्याचा कोणताही हेतू नाही. टेस्ला आणि स्पेसएक्सचे अब्जाधीश सीईओ असणाऱ्या मस्क यांच्यासोबतचे त्यांचे संबंध आता संपले आहेत का? असे विचारले असता, ट्रम्प म्हणाले, “मला वाटते की ते आता संपले आहेत.”



    ते पुढे म्हणाले, “मी इतर कामात खूप व्यस्त आहे. तुम्हाला माहिती आहे, मी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली आहे. मी त्याला खूप ब्रेक दिले होते, त्याआधी मी त्याला माझ्या पहिल्या प्रशासनात ब्रेक दिले होते आणि माझ्या पहिल्या प्रशासनात त्याचा जीव वाचवला होता. आता त्याच्याशी बोलण्याचा माझा कोणताही विचार नाही.’’

    २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत मस्क डेमोक्रॅटिक खासदारांना आणि उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी या मस्क यांना इशाराही दिला. ट्रम्प म्हणाले, “जर त्याने असे केले तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील.” तथापि, त्याचे परिणाम काय होतील हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ते असेही म्हणाले की त्यांनी मस्कविरुद्ध कोणत्याही चौकशीबाबत अद्याप चर्चा केलेली नाही.

    Trump warns Musk will face serious consequences if he helps Democrats

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    US Claims China : अमेरिकेचा दावा- चीनने 2020 मध्ये गुप्तपणे अणुचाचणी केली; ताकद वाढवतोय, 6 वर्षांत 400 शस्त्रे बनवली

    US Nuclear : अमेरिकेच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजावर शौचालयांची समस्या; डिझाइनमधील दोषामुळे शौचालये जाम

    Mexico Drug : मेक्सिकोत गृहयुद्धासारखी स्थिती, ड्रग्ज माफियाचा खात्मा; 13 राज्यांत हिंसाचार, 7 जवानांसह 15 ठार