• Download App
    ट्रम्प पुन्हा लढणार अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, म्हणाले- जिंकलो तर दंगलखोरांना माफ करणार! Trump to fight US presidential election again, says if he wins, he will forgive rioters

    ट्रम्प पुन्हा लढणार अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, म्हणाले- जिंकलो तर दंगलखोरांना माफ करणार!

     

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी म्हटले की, 2024 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालो तर कॅपिटल हिलवर 6 जानेवारीला झालेल्या हिंसाचारातील आरोपींना माफ करू. ट्रम्प यांनी टेक्सासमधील एका रॅलीत सांगितले की, जर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि जिंकले तर ते त्या लोकांशी न्याय्य वागणूक देतील आणि त्यांना माफीची आवश्यकता असल्यास त्यांना माफ करतील.Trump to fight US presidential election again, says if he wins, he will forgive rioters


    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी म्हटले की, 2024 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालो तर कॅपिटल हिलवर 6 जानेवारीला झालेल्या हिंसाचारातील आरोपींना माफ करू. ट्रम्प यांनी टेक्सासमधील एका रॅलीत सांगितले की, जर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि जिंकले तर ते त्या लोकांशी न्याय्य वागणूक देतील आणि त्यांना माफीची आवश्यकता असल्यास त्यांना माफ करतील.



    जो बायडेन यांच्या हातून 2020 मध्ये झालेल्या पराभवानंतर ट्रम्प यांनी मात्र अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार की नाही हे स्पष्ट केले नाही, परंतु त्यांनी निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, आरोपी दंगलखोरांचे खूप वाईट झाले आहे आणि ते सत्तेत येताच यावर निर्णय घेतील.

    1812 नंतर अमेरिकन संसदेवर झालेला सर्वात मोठा हल्ला

    6 जानेवारी 2021 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी निवडणुकीतील पराभवानंतर यूएस कॅपिटल हिलवर हल्ला केला. हा हल्ला 1812 च्या युद्धानंतर अमेरिकन संसदेवरील सर्वात मोठा हल्ला होता. संतप्त जमावाने तेथे उपस्थित पोलिसांवर हल्ला केला. बायडेन यांचा विजय प्रमाणित करण्यापासून थांबवावे, अशी ट्रम्प समर्थकांची मागणी होती. यानंतर जो बायडेन यांनी अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यानंतर दंगलीच्या आरोपाखाली 50 राज्यांमध्ये 725 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली.

    Trump to fight US presidential election again, says if he wins, he will forgive rioters

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या