• Download App
    America अमेरिकेत नववर्ष साजरे करणाऱ्या लोकांना ट्रकने चिरडले

    America : अमेरिकेत नववर्ष साजरे करणाऱ्या लोकांना ट्रकने चिरडले; 10 ठार, 35 हून अधिक जखमी; हल्लेखोराने गोळीबारही केला

    America

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : America  1 जानेवारी रोजी अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात एका व्यक्तीने नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर पिकअप ट्रक चालवला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला, तर 35 जण जखमी झाले.America

    भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता ही घटना घडली. यावेळी न्यू ऑर्लीन्समध्ये रात्रीचे ३:१५ वाजले होते. शहरातील सर्वात गजबजलेल्या बॉर्बन स्ट्रीटवर हजारो लोक आनंदोत्सव साजरा करत होते. अचानक एक वाहन गर्दीला तुडवत पुढे सरकले.



    या धडकेनंतर चेंगराचेंगरी झाली. धडकेनंतर अनेक लोक खाली पडले. यानंतर एक व्यक्ती त्यातून खाली उतरली. त्याने लोकांवर गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिस दलालाही गोळीबार करावा लागला. एनबीसी न्यूजनुसार, हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे.

    एबीसी न्यूजने पोलिस प्रवक्त्याचा हवाला देत म्हटले की, हा हल्ला मुद्दाम करण्यात आला होता. या घटनेनंतर नववर्षाच्या उत्सवाचे वातावरण शोकाकुल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत जखमींना शहरातील 5 रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    यापूर्वी 25 डिसेंबरला जर्मनीतही असाच अपघात झाला होता. मॅग्डेबर्ग शहरातील बाजारपेठेत सौदीतील एका डॉक्टरने लोकांवर कार चालवली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

    सीबीएस न्यूजनुसार, हल्लेखोराचे विदेशी दहशतवादी गटांशी संबंध होते की त्यांच्यापासून तो प्रेरित होता याचा तपास एफबीआय करत आहे. एफबीआयने हल्लेखोराचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर गोळी झाडली त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    पोलिस अधीक्षक ॲन किर्कपॅट्रिक यांनी सांगितले की, हा हल्ला मुद्दाम केला होता आणि अनेक जीवितहानी करण्याच्या हेतूने केला होता. हल्लेखोराने बॉर्बन रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी बॅरिकेड्स तोडले. त्याचा नरसंहार करण्याचा बेत होता. जास्तीत जास्त लोकांना जखमी करण्याचा प्रयत्न करत होता.

    या घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्हिट डेव्हिसने बीबीसीला सांगितले की, “या घटनेने सगळेच हादरले आहेत. यापेक्षा वाईट मी कधीच पाहिले नाही. हल्ल्याच्या वेळी मी बारमध्ये होतो. तिथे मोठ्या आवाजात संगीत वाजत होते, त्यामुळे मी गोळीबाराचा आवाज ऐकला नाही पण काही क्षणांनी मी टेबलाखाली लपलेले लोक पाहिले.

    Truck crushes people celebrating New Year in America; 10 killed, more than 35 injured; attacker also opened fire

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या