विशेष प्रतिनिधी
आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानला IMFसमोर नमते घेण्याशिवाय आता तरणोपाय राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत झालेल्या करारानुसार 170 अब्ज रुपयांचे नवे कर पाकिस्तानला लावावे लागणार आहेत. यासंबंधीची घोषणा पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी शुक्रवारी केली. त्यासाठी लवकरच मिनी बजेट मांडण्यात येणार आहे. Tough conditions for Pakistan’s loan from IMF
आयएमएफने पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर इशाक दार यांनी ही घोषणा केली आहे. वास्तविक, शुक्रवारी आयएमएफ अधिकारी आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या बैठकीत आयएमएफने करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, कारण तेव्हा पाकिस्तानला आयएमएफच्या अटी मान्य नव्हत्या.
पाकिस्तानकडून वारंवार विनंती करूनही, आयएमएफने पाकिस्तान सरकारला खर्च कमी करण्यासाठी आणि तिजोरी वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सांगितले. IMF ने पाकिस्तानला IMFच्या सर्व सूचना पूर्ण केल्यावरच कर्ज मिळेल असे स्पष्टपणे सांगितले होते.
पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांची घोषणा
कर्ज देण्यावर पाकिस्तानशी चर्चा संपल्यानंतर आयएमएफने एक संक्षिप्त निवेदन जारी केले. यानंतर लगेचच पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी पत्रकार परिषद घेतली. IMFचे कर्ज मिळवण्यात अयशस्वी होऊनही, अर्थमंत्र्यांनी दावा केला की जागतिक कर्जदात्याशी सकारात्मक चर्चा संपली आहे आणि कर्ज कार्यक्रम पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारला मिनी बजेटद्वारे करांमधून 170 अब्ज रुपये उभे करावे लागतील.
ते पुढे म्हणाले की, कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी व्हर्च्युअल चर्चा सुरूच राहील. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनीही शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्धतेसह करारावर बोलणी करत असल्याचे म्हटले.
काय आहे पाकिस्तानचे मिनी बजेट?
पाकिस्तानच्या इंग्रजी वृत्तपत्र ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’नुसार, या मिनी बजेटमध्ये ऊर्जेच्या किमती वाढवण्यासोबतच टॅक्स स्लॅबमध्ये वाढ करण्यात येईल. थोडक्यात IMFच्या कठोर अटी यात असतील. मिनी बजेटनंतर जीएसटी 17 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. याद्वारे पाकिस्तान 270 अब्ज रुपये उभे करू शकतो.
पाकिस्तानी मंत्र्यांनी दिला गंभीर इशारा
पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी आयएमएफच्या अटी पाळल्या तर पाकिस्तानात दंगली होतील, असा इशारा दिला होता. आम्हाला कमी अटींसह कर्ज मिळवणे आवश्यक आहे. आधीच महागाईच्या झळा सोसत असलेले आपले नागरिक जाचक अटींचा धक्का सहन करू शकणार नाहीत, असे ते म्हणाले होते. पाकिस्तानची स्थिती अत्यंत वाईट आहे. अशा परिस्थितीत आयएमएफने एक-दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले तरी त्याचा फारसा फायदा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला होणार नाही.
पाकिस्तान कर्जाच्या जाळ्यात अडकला
कर्जाच्या जाळ्यात पाकिस्तान चांगलाच अडकला आहे. पाकिस्तानच्या इंग्रजी वृत्तपत्र ‘द डॉन’नुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने गुरुवारी माहिती दिली की पाकिस्तानचा परकीय चलन साठा 170 मिलियन डॉलरवरून 2.9 अब्ज डॉलरवर घसरला आहे.
पाकिस्तानस्थित आरिफ हबीब लिमिटेडच्या मते, पाकिस्तानचा परकीय चलन साठा फेब्रुवारी 2014 पासून सर्वात कमी आहे. ही रक्कम केवळ 15 दिवसांच्या खरेदीसाठी पुरेशी आहे.
सर्वात कमी परकीय चलनसाठी
पाकिस्तानकडे सध्या केवळ 2.9 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी आहे. त्यामुळे जुन्या कर्जाचे हप्तेही भरता येत नाहीत. चीन आणि सौदी अरेबिया लवकरच पाकिस्तानला 13 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज देणार असल्याचे अर्थमंत्री इशाक दार यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितले होते. ते आजतागायत पूर्ण झालेले नाही आणि दोन्ही देश गप्प आहेत.
तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF नेही कर्जाचा तिसरा हप्ता थांबवला आहे. अशा स्थितीत जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत विदेशी कर्ज आणि आयात परतफेड करण्यासाठी निधी कोठून येणार यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चीनने दिला धोका
पाकिस्तानच्या ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ वृत्तपत्रातील वृत्तानुसार- अर्थमंत्री सौदी अरेबिया आणि चीनकडून 13 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मिळवण्याचा दावा करत असतील, परंतु वास्तव काही वेगळेच आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला दोन्ही देशांसोबत बोलणी झाली आणि आतापर्यंत एकही पैसा मिळणे तर दूरच, देण्याचे आश्वासनही मिळालेले नाही.
रिपोर्टनुसार चीन एक पाऊल पुढे गेला आहे. त्याने पाकिस्तानकडून 1.3 अब्ज डॉलर्सचा हप्ता मागितला आहे. चीनच्या या कृतीवर पाकिस्तान सरकारने अद्याप काहीही म्हटलेले नाही. दार आता दावा करत आहेत की, सौदी अरेबियाशी चर्चा सुरू आहे आणि तेथून लवकरच 3 अब्ज डॉलर मिळतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाने याप्रकरणी मौन बाळगले आहे.
Tough conditions for Pakistan’s loan from IMF
महत्वाच्या बातम्या
- तुर्कीचा भारतविरोध विसरून भारताची तुर्कीला मदत; तुर्की महिलेची भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी
- शेकडो विद्यार्थ्यी, सोशल मीडिया एन्फुएन्झर्सना आज मुंबईतून वंदे भारत एक्सप्रेसची मोफत सफर
- राज्यसभेत मोदींच्या भाषणात विरोधकांच्या घोषणाबाजीचे अडथळे, पण समाजातील लाभार्थ्यांना १०० % लाभाचा पंतप्रधानांचा निर्धार