विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : प्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ या कंपनीला अवकाश कक्षेपर्यंत विमान उड्डाण करण्यास अमेरिकेच्या विमान वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे ते जमिनीपासून ९० किलोमीटर उंचीपर्यंत पर्यंटकांना घेऊन जाऊ शकणार आहेत.Torist can see earth from space also
ब्रॅन्सन यांच्या कंपनीला त्यांच्या विमानाची चाचणी घेण्यास आधीच परवानगी मिळाली होती. या चाचण्या समाधानकारकरित्या पार पडल्याने आता पर्यटकांनाही घेऊन जाण्याची त्यांना मुभा मिळाली आहे. अवकाशकक्षेपर्यंत जाऊन वजनविरहित स्थिती अनुभवण्याचा आणि पृथ्वीला दुरुन पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी सुमारे ६०० जणांनी ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’कडे नोंदणीही केली आहे.
त्यांनी त्यासाठी आगाऊ रक्कमही भरली आहे. या ‘अवकाशवीरां’मध्ये अतिश्रीमंत उद्योगपती आणि सिनेजगतातील कलाकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. अमेरिकेतील न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात उभारलेल्या विशेष तळावरून विमानाचे उड्डाण होणार आहे. पहिल्या फेरीत खुद्द रिचर्ड ब्रॅन्सन यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.
ॲमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस हे देखील त्यांच्या कंपनीद्वारे निर्मित यानातून २० जुलैला अवकाशात उड्डाण करणार आहेत. त्यापूर्वीच, ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’च्या विमानाचे उड्डाण करण्याचा ब्रॅन्सन यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या कंपनीने मात्र उड्डाणाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
Torist can see earth from space also
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसमधील सी म्हणजे कनींग- धूर्त, भाजपाची बी टीम असल्याच्या आरोपावर बसपच्या मायावती यांचा कॉँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
- बांग्ला देशाची आंबा डिप्लोमसी, शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठविले २६०० किलो आंबे