Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. चीनच्या होई जिहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले. Tokyo Olympics India Medal List 2021 Updates Weightlifter Mirabai Chanu Wins India’s First At Tokyo Olympics
वृत्तसंस्था
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. चीनच्या होई जिहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मीराबाई चानूचे सिल्व्हर मेडल जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पीएम मोदी म्हणाले की, मीराबाईच्या यशामुळे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळेल.
दुसरीकडे भारतीय नेमबाज सौरभ चौधरीने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत सातवे स्थान मिळविले. सौरभने सहाव्या मालिकेच्या पात्रता फेरीत 600 पैकी 586 गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. पण अंतिम सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.
पुरुषांच्या हॉकीमध्ये भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांची जोडी तिरंदाजी मिश्र स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. त्याच वेळी नेमबाजीच्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये एलाव्हनिल वॅलारीवान आणि भारताची अपूर्वी चंदेला अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत. ज्युडोमध्ये भारताच्या सुशीला देवीला पराभवाला सामोरे जावे लागले.
Tokyo Olympics India Medal List 2021 Updates Weightlifter Mirabai Chanu Wins India’s First At Tokyo Olympics
महत्त्वाच्या बातम्या
- शहरी नक्षलवादी आरोपींना जामीन देण्यास ठाकरे – पवार सरकारचा न्यायालयात विरोध
- Pegasus Effect; की अजब तर्कट??; सरकारी कर्मचाऱ्यांवर मोबाईल कमी वापरण्याचे ठाकरे – पवार सरकारचे बंधन
- बोगस मतदान तातडीने रोखण्याची गरज, सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त
- ट्विटर इंडियाच्या एमडींना न्यायालायाचा दिलासा, उत्तर प्रदेश पोलिसांवर कडक ताशेरे
- रस्त्यांची झाडलोट करणाऱ्या महिलेला सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसण्याचा मान