• Download App
    Iranians इजरायलला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानकडून इराणची सीमा "सील"; तेहरानमधून नागरिकांचे तुर्कस्तान कडे पलायन!!

    इजरायलला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानकडून इराणची सीमा “सील”; तेहरानमधून नागरिकांचे तुर्कस्तान कडे पलायन!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इजरायल आणि इराण यांच्या युद्धात आगाऊपणे उतरून इजरायला अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने प्रत्यक्षात इराणची सीमा “सील” केली. त्यामुळे इस्रायलच्या हल्ल्याला घाबरलेल्या इराणी नागरिकांचे तेहरानमधून पाकिस्तानात पलायन होण्यापेक्षा ते तुर्कस्तानकडे पलायन करत आहेत. Iranians

    इराण मधली अण्वस्त्रे नष्ट केल्यानंतर पाकिस्तानचा नंबर लावू, अशी दमबाजी इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी केली. त्याबरोबर पाकिस्तानच्या डोक्यात तिडीक गेली गेली. पाकिस्तानने इस्रायल वर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली. पण प्रत्यक्षात राजकीय व्यवहारात इराणची बलुचिस्तानला लागून असलेली बॉर्डर “सील” केली. कारण इजरायली हल्ल्याच्या भीतीने इराणी नागरिकांचे पाकिस्तानात पलायन होण्याचा धोका वाढला. इराण आणि इजरायल यांच्या युद्धामुळे आधीच पाकिस्तान मधल्या बलुचिस्तान प्रांतात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई झाली. त्यामुळे प्रांतातले सगळे पेट्रोल पंप बंद करावे लागले. बाकीच्या वस्तूंची तुफान महागाई झाली. त्याचे दुष्परिणाम पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर व्हायला लागले. म्हणून पाकिस्तानने इराणची बॉर्डर “सील” करून टाकली.

    त्यामुळे इजरायलच्या वाढत्या हल्ल्यांच्या भीतीने इराणी नागरिकांनी तेहरानमधून तुर्कस्तान कडे पलायन करायला सुरुवात केली. तेहरान मधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर लाखो गाड्या उतरल्या. त्यामुळे महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सोशल मीडियावर त्याचे हजारो व्हिडिओ व्हायरल झाले. इजरायलच्या हल्ल्यांना तोंड देताना इराणने इस्रायल वर प्रतिहल्ले केले. पण ते बरेचसे नाकाम झाले. त्या उलट इस्रायलने हल्ले केले, तर जीवित आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान होण्याच्या भीतीने इराणी नागरिकांनीच पलायन करायला सुरुवात केली. कारण इराणी राज्यकर्ते आपले संरक्षण करू शकतील याची खात्री त्यांना वाटेनाशी झाली.

    Thousands of Iranians try to flee Israel attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मनोज जरांगेंच्या आंदोलनात पवार + ठाकरेंचे नेते घुसले; पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत पवार + ठाकरेंची भूमिका संशयाच्या घेण्यात!!

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??