• Download App
    अमेरिका, ब्रिटनची अखेरची उड्डाणे बाकी; अफगणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी हजारो लोक प्रतिक्षेत Thousand peoples waiting to fly from Afghanistan

    अमेरिका, ब्रिटनची अखेरची उड्डाणे बाकी; अफगणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी हजारो लोक प्रतिक्षेत

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – दहशतवादी हल्ल्यानंतर काही काळ थांबविण्यात आलेली सुटका मोहिम पुन्हा सुरु करण्यात आली आहे. अद्यापही शेकडो नागरिक अफगाणिस्तानात अडकून पडले असून त्यांना लवकरात लवकर सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सुटका मोहिमेला वेग आणणार असल्याचे अमेरिकेने सांगितले. Thousand peoples waiting to fly from Afghanistan

    आणखीही हल्ले होण्याचा इशारा गुप्तचरांनी दिला आहे. हल्ला होऊनही विमान उड्डाणे सुरु होताच लोकांनी विमानतळाच्या प्रवेशद्वारांबाहेर पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली. कालच्या तुलनेत आज गर्दी अधिक होती. या सर्वांना तालिबानी दहशतवादी तपास नाक्यांवर अडवत होते.



    काबूलमध्ये ‘इसिस-खोरासन’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये काही अमेरिकी सैनिकांचाही समावेश आहे. हल्ला होण्याचा अंदाज गुप्तचरांनी वर्तविल्यानंतर अमेरिकेसह, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा या देशांनी आपल्या नागरिकांना विमानतळावरून बाहेर पडण्याचा आणि सुरक्षितस्थळी थांबण्याची सूचना केली होती. या सर्व लोकांना ३१ ऑगस्टच्या आत काबूलमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

    सुटका मोहिम वेळेवर संपविण्यास तालिबानने सांगितले आहे. इटली, अमेरिका, ब्रिटन या देशांच्या विमानांनी आपल्या देशांच्या नागरिकांसह काही अफगाण नागरिकांनाही देशाबाहेर सुरक्षित नेले. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपली सुटका मोहिम गुंडाळली आहे.

    Thousand peoples waiting to fly from Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या