विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. त्यावर आता परदेशातून प्रतिक्रिया येत आहेत. खासदार अॅंडी लेविन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत ट्विटरवर पोस्ट केली आहे.
This is the proof of what happens when hard workers come together – America’s reaction
भारत आणि जगामध्ये श्रमिक एकत्र आले तर , कार्पोरेट हिताचा विचार करणाऱ्यांना हरवू शकतात याचा हा निर्णय पुरावा आहे व आम्हाला या निर्णयाचा आनंद झाला आहे, असे लेविन म्हणाले आहेत. जवळपास वर्षभर विरोध होत होता व अखेर कृषी कायदे रद्द झाले आहेत. हा स्वागतार्ह निर्णय आहे असेही लेविन म्हणाले.
भारतीय कृषी कायद्याबद्दल जगभरात चर्चा झाली होती. रिहाना या अमेरिकन पॉप सिंगरने केलेल्या ट्विट मुळे वाद झाले होते. या बहूचर्चित विषयावर परदेशातून प्रतिक्रिया येत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा दावा करणारे तीनही कायदे रद्द करणार असल्याचे शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.
२९ नोव्हेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेण्यात येतील असे मोदींनी जाहीर केले आहे. वर्षभर दिल्लीच्या वेशीवल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घरी परत जाण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. शेतकरी संघटनेतर्फे या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, संसदेत प्रत्यक्ष कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. २६ नोव्हेंबर २०२० पासून संयुक्त किसान मोर्चातील संघटना सिंधू, टिकरी, गाझीपुर येथे आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार व शेतकरी संघटने मध्ये ११ बैठक झाल्यानंतर जानेवारी महिन्यात चर्चा थांबली. त्यानंतर दहा महिन्यांनी कायदे रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे.
This is the proof of what happens when hard workers come together – America’s reaction
महत्त्वाच्या बातम्या
- नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले, म्हणाले- इम्रान खान माझे मोठे भाऊ, मला खूप प्रेम दिले!
- हिंदी बिग बॉस मध्ये अभिजित बिचुकलेची होणार एन्ट्री
- कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी
- “कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर….” ; अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा