अमेरिकेन ड्रिम म्हणजे काय असते याचा आणखी एक प्रत्यय आज आला आहे. भारतातून अमेरिकेत जाताना खिशात आठ डाँलर्स असलेल्या एका भारतीयाची मुलगी अमेरिकेची असोसिएट अॅटर्नी जनरल म्हणून निवडून आली आहे. अमेरिकेच्या कायदा विश्वातील हे तिसऱ्या क्रमांकाचे पद आहे.This is American Dream, the daughter of an Indian who came with eight dollars in his pocket became Associate Attorney General
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेन ड्रिम म्हणजे काय असते याचा आणखी एक प्रत्यय आज आला आहे. भारतातून अमेरिकेत जाताना खिशात आठ डाँलर्स असलेल्या एका भारतीयाची मुलगी अमेरिकेची असोसिएट अॅटर्नी जनरल म्हणून निवडून आली आहे. अमेरिकेच्या कायदा विश्वातील हे तिसऱ्या क्रमांकाचे पद आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक वनिता गुप्ता यांनी हा बहुमान मिळविला आहे. अमेरिकी सिनेटने बुधवारी गुरूवारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकी महिला आहेत.
वनिता गुप्ता यांना सिनेटमध्ये 51 मतं मिळाली. रिपब्लिकन पक्षाच्या लिसा मुर्कोस्की यांनीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असलेल्या वनिता गुप्ता यांना मत दिलं.
बरोबरीत मतं पडल्यास निर्णायक मत देण्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस उपस्थित होत्या. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी 50 या प्रमाणे 100 सदस्य असलेल्या सिनेटमध्ये 51 विरुद्ध 49 अशा मतांनी वनिता गुप्ता यांचा विजय झाला.
वनिता गुप्त यांच्या नियुक्तीबद्दल भारतीय-अमेरिकन समूहाने अभिनंदन केलं आहे. वनिता गुप्ता या अशा एका भारतीयाच्या कन्या आहेत, जे फक्त खिशात आठ डॉलर्स आणि एक स्वप्न घेऊन भारतातून अमेरिकेत आले होते.
वनिता गुप्ता देशातील एक आघाडीच्या नागरी हक्क वकील असून, असोसिएट अॅटर्नी जनरल म्हणून त्या न्यायव्यवस्थेत उच्च आदर्श निर्माण करतील, अशी प्रतिक्रिया भारतीय अमेरिकन सल्लागार समूह इम्पॅक्टचे कार्यकारी संचालक नील मखीजा यांनी व्यक्त केली आहे.
भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या फिलाडेल्फिया भागात स्थिरावलेल्या भारतीय कुटुंबात वनिता गुप्ता यांचा जन्म झाला. वकील म्हणून काम करत असताना त्यांनी कायम नागरी हक्कांसाठी लढा दिला आहे.
येल युनिवर्सिटीतून कला शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून कायदा विषयात डॉक्टरेट मिळवली. वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी एनएएसीपी डिफेन्स फंडमधून कारकिदीर्ला सुरुवात केली.
चुकीचे आरोप ठेवून अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवलेल्या टेक्सासमधील ट्युलीया इथल्या 38 कृष्णवणीर्यांना त्यांनी यशस्वीरीत्या सोडवलं.अमेरिकन सिव्हील लिबर्टीज युनियनमध्ये त्यांनी स्थलांतरित आणि बेकायदेशीररीत्या सीमा ओलांडणाºया (आयसीई) लोकांवरील कारवाई विरुद्ध आवाज उठवला.
यामुळे स्थलांतरितांना सरसकट तुरुंगात डांबणे आणि कुटुंबांना नजरकैदेत ठेवण्याच्या पद्धतीला आळा बसला. 2014 ते 2017 या कालावधीत वनिता गुप्ता यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत नागरी हक्क विभागाच्या असोसिएट अॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिलं.
त्यावेळी त्यांनी गुन्हेगारी कायद्यात सुधारणा केल्या. द्वेषमूलक गुन्ह्यांसाठी न्यायाच्या बाजूनं लढा दिला. मतदानाचा हक्क आणि विषमतेविरुद्ध आवाज उठवला.अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेसाठी दोन अत्यंत योग्य आणि मान्यताप्राप्त वकीलांची नावं सुचवली असून, त्यांनी आपल्या कारकिर्दीत जातीय समानता आणि न्यायाला प्राधान्य दिलं आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे.
This is American Dream, the daughter of an Indian who came with eight dollars in his pocket became Associate Attorney General
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदाची बातमी : १८ वर्षांवरील सर्वांना २८ एप्रिलपासून रजिस्ट्रेशनची मुभा, अशी करा नोंदणी
- Pfizer Vaccine : फायजर कंपनीची नफा न कमावता भारताला कोरोनावरील लस देण्याची घोषणा
- पंतप्रधान मोदींनी रद्द केल्या उद्या होणाऱ्या बंगालमधील सर्व सभा, कोरोना परिस्थितीवर घेणार उच्चस्तरीय बैठक
- अनास्थेचा परिणाम : जानेवारीतच केंद्राने कोरोना लाटेचा राज्यांना दिला होता इशारा, दुर्लक्षामुळे महामारीचा झाला उद्रेक
- ‘जिथे कमी तिथे आम्ही’ : ऑक्सिजनसाठी कॉर्पोरेट- सरकारी कंपन्यांचा पुढाकार, टाटा-रिलायन्ससह अनेक कंपन्या मैदानात