विशेष प्रतिनिधी
काबुल : ऐन हिवाळा तोंडावर असताना देशात असणारी अन्नटंचाई आणि वाढत्या गरिबीचा सामना अफगाणिस्तान मधील जनता करत आहे. मानवतेच्या दृष्टीने बऱ्याच देशांनी अफगाणिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. तर आता जागतिक बँकेने देखील अफगाणिस्तानसाठी 280 दशलक्ष डॉलर्स इतकी गोठवलेला निधी देण्याचे ठरवले आहे.
The World Bank will provide assistance to Afghanistan, with 31 donors providing assistance to the ARTF
अफगाणिस्तान मधील अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीनंतर अफगाणिस्तानमध्ये लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शिक्षण, दैनंदिन गरजा, व्यापार, नोकरी अशा एक ना अनेक समस्यांनी अफगाणिस्तानमध्ये डोके वर काढले आहे. तर जागतिक बँकेच्या मंडळाने गोठवलेल्या ट्रस्ट फंडातून 280 दशलक्ष डॉलर्स इतकी मदत हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मदत अफगाणिस्तान रिकन्स्ट्रक्शन ट्रस्ट फंड मध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. जवळजवळ 31 देणगीदारांनी हा निधी अफगाणिस्तानमधील लोकांसाठी देण्याचे ठरवले आहे. आणि लवकरच म्हणजे उद्या शुक्रवारीही देणगीदारांची बैठक देखील होण्याची शक्यता आहे. असे सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार कळते.
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल : वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास
मागील जवळपास 20 वर्षांपासून सुरू असलेल्या अफगाणिस्तानातील युद्धानंतर अफगाणिस्तानमधील 39 दशलक्ष लोकांचे हाल चालू आहे. म्हणूनच अफगाणिस्तान रिकन्स्ट्रक्शन ट्रस्ट फंडद्वारे 1.5 बिलियन डॉलर्स पैकी 500 दशलक्ष डॉलर्स ही किंमत जागतिक बँकेकडून मानवतावादी संघटनांकडे हस्तांतरीत केली जाणार आहे.
या सर्व गोष्टींमध्ये प्रश्न एकच उरतो तो म्हणजे, अफगाणिस्तानमध्ये काम करणारऱ्या काही संस्थां आणि बँकांवर आजही अमेरिके तर्फे यांनी काही निर्बंध घालण्यात येण्याची शक्यता आहे. यूएस ट्रेझरीत तर्फे एक ‘कम्फर्ट लेटर’ देण्यात आले आहे. या लेटरमध्ये असे लिहिले आहे की, कोणत्याही मानवतावादी कार्यासाठी तसेच अफगाणिस्तानमधील लोकांच्या मूलभूत गरजांसाठी, औषधांसाठी, अन्न पुरवठ्यासाठी अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारचे बंधन घालण्यात येणार नाही.
असे असले तरी अमेरिकेकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.
The World Bank will provide assistance to Afghanistan, with 31 donors providing assistance to the ARTF
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! महाराष्ट्रातील ५० हजार गावात आरोग्य यंत्रणाच नाही !औरंगाबाद खंडपीठात बबनराव लोणीकरांनी केली याचिका दाखल
- ममता बॅनर्जी – भूपेंद्र पटेल; एकीकडे राजकीय गाजावाजा; दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा!!
- राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान
- कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड
- म्यानमारमधील लोकांची अवस्था बिकट, संयुक्त राष्ट्रांकडून मदतीचे आवाहन
- अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल
- २०१४ नंतर भारत बनला अमेरिकेचा गुलाम – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर यांचा हल्लाबोल