• Download App
    अमेरिका जगातील इतर देशांना पुरविणार सहा कोटी कोरोना प्रतिबंधक लसी|The United States will supply six million corona vaccines to the rest of the world

    अमेरिका जगातील इतर देशांना पुरविणार सहा कोटी कोरोना प्रतिबंधक लसी

    पुढील काही आठवड्यात अमेरिका जगातील इतर देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचे सहा कोटी डोस पुरविणार आहे. अ‍ॅस्ट्राजेनिका ही लस काही दिवसांतच जगात पाठविली जाईल, असे व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आले आहे.The United States will supply six million corona vaccines to the rest of the world


    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : पुढील काही आठवड्यात अमेरिका जगातील इतर देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचे सहा कोटी डोस पुरविणार आहे. अ‍ॅस्ट्राजेनिका ही लस काही दिवसांतच जगात पाठविली जाईल, असे व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आले आहे.

    व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन पास्की म्हणाले, अ‍ॅस्ट्राजेनिका लसीचे डोस उपलब्ध झाल्यावर तातडीने इतर देशांना पाठविले जातील. पुढील काही दिवसांतच एक कोटी डोस निर्यात केले जातील. सध्या अमेरिकेत पाच कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस बनविले जात आहे. लवकरच ते निर्यात केले जातील.



    पास्की म्हणाल्या सध्या अ‍ॅस्ट्राजेनिका लसीचा एकही डोस अमेरिकेकडे उपलब्ध नाही. अमेरिकेच्या नियंत्रक संस्था तयार असलेल्या डोसची गुणवत्ता तपासणार आहेत.

    त्यानंतरच त्यांची निर्यात केली जाईल. कोणत्या देशांना कोरोना लसी पुरवायच्या यावर बायडेन सरकार विचार करत आहे. आम्ही आमच्या मित्र देशांना तातडीने लसीची मदत करू इच्छितो.

    अ‍ॅस्ट्रोजेनिका लसीला अद्याप अमेरिकेत मान्यता दिलेली नाही. बायडेन सरकारने मार्चमध्ये सांगितले होते की लवकरच कॅनडा आणि मेक्सिको या देशांना चाळीस लाख लसी पुरविल्या जाणार आहेत.

    The United States will supply six million corona vaccines to the rest of the world

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : खामेनेई म्हणाले- ट्रम्पचे हात रक्ताने माखलेले; ट्रम्प यांचे उत्तर- इराण सरकार काही दिवसांचे पाहुणे; इराणमधील हिंसाचारात 3 हजारहून अधिक मृत्यू

    Greenland : ग्रीनलँडमध्ये निदर्शने- ट्रम्प यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले:, म्हटले- आमचा देश विक्रीसाठी नाही

    Donald Trump : ट्रम्प यांनी इजिप्त-इथिओपियाच्या वादामध्ये मध्यस्थीची ऑफर दिली, नाईल नदीच्या पाणीवाटपाचा वाद सोडवण्याचा प्लॅन