• Download App
    अमेरिकाच जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश, सहा लाखांपेक्षा जास्त कोरोना मृत्यू झाल्याचे जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासात उघड|The United States is the world's largest corona-affected country, with more than six million corona deaths, according to a study by Johns Hopkins University.

    अमेरिकाच जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश, सहा लाखांपेक्षा जास्त कोरोना मृत्यू झाल्याचे जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासात उघड

    भारतातील कोरोनाच्या उद्रेकाबाबत विषारी चित्रण करणाऱ्या अमेरिकेतील माध्यमांच्या डोळ्यात जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासाने चांगलेच अंजन घातले आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनाने सहा लाख मृत्यू झाल्याचे अभ्यासात उघड झाले आहे.The United States is the world’s largest corona-affected country, with more than six million corona deaths, according to a study by Johns Hopkins University.


    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : भारतातील कोरोनाच्या उद्रेकाबाबत विषारी चित्रण करणाऱ्या अमेरिकेतील माध्यमांच्या डोळ्यात जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासाने चांगलेच अंजन घातले आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनाने सहा लाख मृत्यू झाल्याचे अभ्यासात उघड झाले आहे.

    जॉन हॉपकीसन्स युनिव्हर्सीटीने बुधवारी हा अभ्यास जाहीर केला आहे. त्यानुसार जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश अमेरिका आहे. अमेरिेकत ३ कोटी ३४ लाख ८५ हजार ५४९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये ६ लाख २६३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.



    भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये होत असलेल्या मृत्यूबाबत विषारी प्रचार करण्यात आला होता. एकच फोटो वेगवेगळ्या ठिकाणचा असल्याचे भासवून भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाही असा प्रचार करण्यात आला.

    यातून भारताची प्रतिमा सर्वाधिक कोरोना बाधित देश असा रंगविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अमेरिकेतीलच एका विद्यापीठाच्या अभ्यासात येथे कोरोनाने कसा हाहाकार माजविला हे उघड झाले आहे.

    अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. याठिकाणी ६३,१९१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्ये ५३,५५८, टेक्सासमध्ये ५१ हजार ९४०, फ्लोरिडामध्ये ३७,२६५ मृत्यू झाले. पेनिसेल्हवानिया, न्यू जर्सी, इलिनॉईस, जॉर्जिया, मिशिगन आणि ओहिओ या राज्यांत २० हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत.

    जगातील एकूण कोरोना बाधितांच्या २० टक्के नागरिक हे अमेरिकेतील आहेत. जगात कोरोनाने बळी गेलेल्यांपैकी १५ टक्के अमेरिकेतील आहेत. २७ मे २०२० पर्यंत एक लाख, २२ सप्टेंबर २०२० पर्यंत २ लाख, १४ डिसेंबरपर्यंत ३ लाख मृत्यू झाले हेते. २०२१ च्या जानेवारी महिन्यात चार लाख मृत्यूंचा तर २२ फेब्रुवारी पर्यंत पाच लाख मृत्यू झाले.

    जॉन हॉपकीन युनिव्हर्सीटीच्या अभ्यासानुसार भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा देश अ सला तरी येथील मृत्यूची संख्या अमेरिकेच्या निम्मी म्हणजे ३ कोटी ७० लाख आहे. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्ण भारतापेक्षा कमी असले तरी मृत्यू मात्र जास्त म्हणजे ४ कोटी ९० लाख झाले आहेत. फ्रा न्समध्ये ५८ लाख रुग्ण आणि १ लाख १० हजार मृत्यू, तुर्कस्थानात ५३ लाख रुग्ण आणि ४८,८७९ मृत्यू आहेत.

    The United States is the world’s largest corona-affected country, with more than six million corona deaths, according to a study by Johns Hopkins University.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या